
no images were found
पिता-पुत्र झोपेत बरळतात ‘त्या’ प्रकरणावरून लक्ष्मण ढोबळे यांची ठाकरेंवर टीका
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची होती, असं मानलं जात आहे. या वाघनखांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ब्रिटनस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील सदर वाघनखे तीन वर्षांसाठी उसनावारी देण्याचं मान्य केलं आहे. मग, हे कर्जावर आहे की परतावा आहे? परतावा असेल, शिवाजी महाराज यांचं मंदिर व्हावं आणि त्यात वाघनखे ठेवण्यात यावी. पण, ही वाघनखे शिवकालीन की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत?” असे काही प्रश्न आदित्य ठाकर यांनी केले होते.
त्यावर लक्ष्मण ढोबळे म्हणाले, “जगातील लोकांनी मान्यता दिलेल्या वाघनखांबद्दल पिता-पुत्र चुकीचं बोलत आहेत. पिता-पुत्र झोपेत बरळतात. ही वाघनखे इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी आणली जात आहेत. पहिली आणि दुसरी मातोश्री बांधली तरी समाधान मिळत नाही. माझा बाप चोरीला गेला म्हणत आहेत. चिन्ह गेलं, आमदार सोडून गेले, पक्ष गेला, तरी देखील ओरडत फिरत आहेत, अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी ठाकरेंवर केली आहे.