
no images were found
माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…सुप्रिया सुळें
राष्ट्रवादी काँग्रेसला प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे यश मिळालं आहे. माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते. यालाच नेतृत्व म्हणतात. प्रफुल्ल पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही, असं विधान सुप्रिया सुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्या.
सुळे म्हणाल्या, पटेल यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधी आली नाही. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना २५ वर्षांपासून नेते मानलं आहे. प्रफुल्ल पटेल आठवड्यातून तीन वेळा शरद पवार यांना भेटायचे. सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं. त्यामुळे पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही.