Home राजकीय आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ – मनोज जरांगे

आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ – मनोज जरांगे

0 second read
0
0
25

no images were found

आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ – मनोज जरांगे

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीकरता मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं. बरेच दिवस उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्युस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं
परंतु, यावेळी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. एक महिन्याच्या अवधीत मराठ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचं त्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, हा अल्टिमेटमचा कालावधी संपत आला आहे. तर, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील रोज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन जाहीर सभा घेत आहेत.
दरम्यान, काल झालेल्या नांदेड येथील सभेत त्यांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ओबीसी नेते जे आता मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यांना मराठ्यांनी आतापर्यंत खूप दिलं. कधीतरी मराठ्यांच्या कामाला याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली.
आता आमच्यावर वेळ आली आरक्षण घ्यायची तर आम्हाला म्हणतात की ५० टक्क्याच्या आत आरक्षण येऊ देणार नाही. पण आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…