
no images were found
‘भष्ट्राचार मुक्त भारत‘ संकल्पपुर्तीसाठी देशभर दौरा करणार–हेमंत पाटील
मुंबई : देशात गेल्या दशकात भ्रष्टाचाराविरोधात समाजसुधारक अण्णा हजारे यांनी उभारलेल्या आंदोलनाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली होती.या आंदोलनानंतर एक पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला तर एक नवीन राष्ट्रीय पक्ष देशाला मिळाला.मात्र, या सर्व घडामोडी होत असतांना देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प करीत जागतिक किर्ती मिळवणारे अण्णा केवळ राळेगणसिद्धीपुरते मर्यादीत झाले.अशात अण्णांनी अर्धवट सोडलेले भ्रष्टाचारमुक्तीचे कार्य पुर्ण करण्यासाठी देशभर दौरा करणार असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी दिली.
भ्रष्टाचाराविरोधात एक व्यापक जनमोहित हाती घेण्याचा आयएसीचा मानस असून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ उभारण्यात येईल,असे देखील पाटील म्हणाले.अण्णा यांना अभिप्रेत असलेला भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या पायाभरणीसाठी अनेक पक्षाकडून असलेली खासदार,आमदारकीची ऑफर नाकारली आहे, असे देखील पाटील यांनी यानिमित्त स्पष्ट केले.महाराष्ट्रासह तामिळनाडू, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, केरळ आणि देशभरात भ्रष्ट्राचारावर आळा बसवण्यासाठी संघटना अविरतपणे कार्यरत असल्याचे देखील पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर काही प्रमाणात आळा बसला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पंरतु, भ्रष्टाचाराच्या मानसिकतेच्या मुळावर घाव घालण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती आवश्यक आहे.देशव्यापी दौऱ्यातून हे उदिष्ट साध्य केले जाईल.संघटनेच्या स्वयंसेवकांकडून विविध राज्यांमध्ये यानिमित्त विशेष मोहिमांचे आयोजन केले जाईल,असे देखील पाटील म्हणाले.