Home सामाजिक महिंद्रा ओजा  ट्रॅक्टर्सच्या डिलिव्हरीजना सातारामधून सुरुवात

महिंद्रा ओजा  ट्रॅक्टर्सच्या डिलिव्हरीजना सातारामधून सुरुवात

23 second read
0
0
30

no images were found

महिंद्रा ओजा  ट्रॅक्टर्सच्या डिलिव्हरीजना सातारामधून सुरुवात

 

सातारा  : भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने महिंद्राचा नवा, वजनाला हलका ट्रॅक्टर – महिंद्रा ओजा  च्या डिलिव्हरीजना सातारामधून सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर डिलिव्हरीजना सुरुवात करण्यात आली असून गणपती विशेष ‘महिंद्राओजाचीवारी, अष्टविनायकाच्याद्वारी’ मध्ये देखील ओजा  झळकणार आहे. यामध्ये अभिनेते श्री अजय पुरकर यांच्या सह महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायकांच्या दर्शन यात्रेचे नेतृत्व ओजा करणार आहे. महाराष्ट्रात डिलिव्हरीज स्वीकारणाऱ्या सर्व ग्राहकांना स्थानिक टीव्ही चॅनेल्सवर दिसण्याची देखील संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील सातारामधील महिंद्राचे प्रमुख डीलर, शिंदे ट्रॅक्टर्स (कराड) आणि अर्जुन ऑटोमोटिव्ह (सातारा) यांनी गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर नवे महिंद्रा ओजा  ट्रॅक्टर्स ग्राहकांना सुपूर्द केले.

महिंद्राचे हे नवे ट्रॅक्टर्स प्रत्येक बाबतीत जागतिक दर्जाचे आहेत. शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी विकसित करण्यात आलेली महिंद्रा ओजा  श्रेणी बनवताना देशभरातील हजारो शेतकऱ्यांकडून मिळालेले प्रतिसाद गंभीरपणे विचारात घेण्यात आले आहेत. फलोत्पादन आणि द्राक्षांच्या शेतीवर विशेष लक्ष केंद्रित करून विकसित करण्यात आलेल्या या श्रेणीला आमचे सहयोगी व शेतकऱ्यांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात ओजा  ट्रॅक्टर श्रेणीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.

ट्रॅक्टर तंत्रज्ञानाची जागतिक मानके आणि आधुनिक डिझाईन यामुळे ओजा  ट्रॅक्टर्स इतरांपेक्षा सरस ठरले आहेत. ऑटोमॅटिक पीटीओ , ऑटोमॅटिक इम्पलेमेंट लिफ्ट अँड ड्रॉप , ऑटोमॅटिक वन साईड ब्रेकींग , ४ व्हील ड्राईव्ह  स्टॅंडर्ड  यांचा समावेश असलेली ओजा  श्रेणी उत्कृष्ट पकड व प्रगत ट्रॅक्टर कामगिरी प्रदान करते. ओजा  चे इंजिन तंत्रज्ञान जागतिक दर्जाचे असून ट्रॅक्टर अतिशय दमदार कामगिरी बजावतात, सहजसोपे संचालन व उत्कृष्ट कामगिरी यामुळे शेतीतील अनेक वेगवेगळ्या कामांसाठी ओजा  सुयोग्य आहे.

आधुनिक डिझाईन आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प्समुळे ओजा  ट्रॅक्टर्स दिसायला तर चांगले आहेतच शिवाय रात्रीच्या वेळी देखील ऑपरेटरला अधिक चांगली व्हिजिबिलिटी मिळवून देतात. कारप्रमाणे कीलेस ट्रॅक्टर स्टार्ट – स्टॉप टेक्नॉलॉजि , ऍडजेस्टेबल सीट ,आणि स्टेरिंग सिस्टिम या वैशिष्ट्यांचा समावेश ओजा  ट्रॅक्टर्समध्ये करण्यात आल्यामुळे बरेच तास देखील ट्रॅक्टर आरामात चालवता येतो.

स्टॅन्डर्ड ६ वर्षांची वॉरन्टी सोबत दिली जात असल्याने ओजा  चे शक्तिशाली तंत्रज्ञान अधिक मजबूत झाले आहे. ९०% पर्यंत वित्तसुविधा आणि कमी व्याजदर यामुळे नवीन ओजा  ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे.

शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढावी यासाठी ओजा  श्रेणीमध्ये प्रोजा , मायओजा आणि  रोबोजा हे तीन तंत्रज्ञान पॅक आहेत, यामध्ये भारतीय शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच सादर करण्यात येत असलेली अनेक तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत. प्रोजा , मायओजा आणि  रोबोजा हे तीन तंत्रज्ञान पॅक

महिंद्राने नुकतीच बहुप्रतीक्षित आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ सोबत असोसिएट स्पॉन्सर विथ स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने+ हॉटस्टारवर ‘को-पॉवर्ड बाय’ स्पॉन्सर म्हणून क्रिकेटसोबत आपला सहयोग अधिक दृढ केल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील प्रमुख टीव्ही चॅनेल्सवर ओजा टीव्हीसी नक्की पहा. महिंद्रा ओजा विषयी अधिक माहितीसाठी कृपया https://www.mahindratractor.com/ ला भेट द्या.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…