no images were found
मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप
मुंबई : ‘मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. सोशल मीडियातून ही घटना समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सदर परिसरात जात सोसायटीच्या सचिवांना माफी मागण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घर नाकारण्याच्या घटनेवरून संताप व्यक्त केला असून सोसायटीला धडा शिकवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना शाबासकी दिली आहे.
सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित,’ असा आक्रमक इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. तसंच सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.