
no images were found
पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन 53460 मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरिकांनी महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्ये व इराणी खणीमध्ये विसर्जित केल्या. इराणी खण व प्रभागात अर्पण केलेल्या मुर्ती महापालिकेने बसविलेल्या स्वयंचलित यंत्राद्वारे खणीमध्ये पुन्हा विसर्जित करण्यात आल्या. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने ठिक ठिकाणी 180 विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी व संस्थांनीही काहीली, कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते.
घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा सकाळी 7 वाजल्यापासून दुस-या दिवशी पहाटे 6.00 वाजेपर्यंत काम करत होती. यामध्ये पवडी विभागाचे 500 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 1200 कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या 16 टिम, 152 टँम्पो 374 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 ॲम्बुलन्स व 10 तराफे अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. पवडी विभागाकडून नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेश मूर्ती टेम्पोमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था केली होती. याचबरोबर महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षीततेसाठी साधनसामुग्री सह तैनात करण्यात आले होते. तसेच विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती. नागरिकांनी विर्सजन केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 16 आरोग्य निरिक्षकांच्या नियंत्राखाली त्या त्या प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रमाणे दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आरोग्य निरिक्षकांच्या टिम व एकटी संस्थेच्या 150 महिला सदस्य निर्माल्य संकलित करुन पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यासाठी जमा करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत कुंड ठेवलेल्या ठिकाणांची, पंचगंगा नदीजवळी गायकवाड पुतळा परिसर व इराणी खण परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी अर्पण केलेले 140 मे.टन. निर्माल्य 5 आयवा, 3 डंपर, 18 ट्रॅक्टर व 5 जेसीबीद्वारे पहाटे 5 वाजेपर्यत गोळा करण्यात आले. तसेच व्हाईट आर्मीचे 75 जवान संकलित करण्यात आलेल्या गणेश मुर्ती विसर्जनास उपस्थित होते. त्याचबरोबर याठिकाणी ज्यादा तराफे लावून 50 हमालांद्वारे स्वतंत्र गणेश मुर्ती विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य व लेखा वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपहशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी हे विसर्जन स्थळी सकाळपासून रविवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत पर्यावरण पूरक गणेश विसर्जन मुर्ती नियोजनास उपस्थित होते.
प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी नागरिकांना गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपुरक, गर्दी टाळून महापालिकेने पर्यायी व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गांधी मैदान विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण 11020, छ.शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण 9111, राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण 7275, ताराराणी विभागीय कार्यालया अंतर्गत एकूण 7699 गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या 18355 मुर्ती नागरीकांनी थेट इराणी खण येथे विसर्जीत करण्यात आल्या. तसेच महापालिकेने बसविलेल्या स्वयंचलित यंत्राद्वारे 17893 गणेश मुर्त्या थेट खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. याव्यतिरिक्त काही नागरीकांनी गणेश मुर्ती घरीच बादलीमध्ये विसर्जीत केल्या.