Home निधन वार्ता KGF फेम कृष्णा जी राव यांचे निधन

KGF फेम कृष्णा जी राव यांचे निधन

3 second read
0
0
151

no images were found

KGF फेम कृष्णा जी राव यांचे निधन

कृष्णा जी राव हे साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार होते. KGF फेम कृष्णा जी राव यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे. कृष्णा हे काही  दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कृष्णा जी राव हे साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार होते. यश स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित KGF व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. परंतु त्यांची यशच्या KGF या चित्रपटातील एका अंध वृद्धाची भूमिका गाजली त्यामुळेच त्यांना खरी ओळख या चित्रपटातून मिळाली होती. केजीएफमधील या भूमिकेनंतर त्यांना एकापाठोपाठ 30 चित्रपटांमध्ये काम मिळाले होते. कृष्णा कुमार दिग्दर्शित ‘नैनो नारायणपूर’ या तेलुगू कॉमेडी चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार पुष्पाच्या हृदयस…