Home सामाजिक पन्हाळा येथे चांगुल पणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला

पन्हाळा येथे चांगुल पणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला

4 second read
0
0
41

no images were found

 

पन्हाळा येथे चांगुल पणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :, चांगुलपणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला पन्हाळ्यात. देशभरातून निवडक समाजसेवी उपस्थिती असणार..डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या “चांगुलपणाची चळवळ” देशव्यापी झाली असून निवडक १०० समाजसेवींची बैठक दि. २५ व २६ सप्टेंबर २०२३ ला पन्हाळा, कोल्हापूर येथे होणार आहे.
अशी माहिती चळवळीचे खंदे कार्यकर्ते राज देशमुख पुणे,नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पारस ओसवाल,ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे अनिल नानिवडेकर यांनी दिली.डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीचा मुख्य उद्देश संविधानातील समता, न्याय व स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित संपूर्ण समाज परिवर्तन हा आहे. उत्तम संस्था, व्यक्ती आणि विचार यांच्याद्वारे समाज परिवर्तन होऊ शकते. या विचाराने देशभर २०० स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. चांगुलपणाची चळवळीने २०१९ च्या महापुरात कोल्हापूर जिल्ह्यात संस्मरणीय काम तर केलेच, तसेच २ गावे दत्तक घेऊन तेथे पुनर्वसन, प्रशिक्षण व प्रबोधनाद्वारे अनेक उपक्रम घेतले. देशभरातील अनेक प्रमुख समाजसेवी, विचारवंत, लेखक, उद्योजक,पत्रकार या चळवळीत सामील आहेत. त्यात वंचित घटकांसह महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्या समस्यांवर कार्य सुरू आहे.
या अभिनव चळवळी मार्फत वंचित घटकांना केंद्रित करून गेली चार वर्ष दिवाळी अंक काढला जातो. २०२२ चा दिवाळी अंक कैद्यांच्या समस्यांवर होता, तर यावर्षी भटक्या व विमुक्त घटकांवर अंक असेल. शिवाय विदेशात संकटात विद्यार्थी अडकलेल्यांना विविध प्रकारे मदत करत व मृतदेह परत आणणे तसेच सक्तीने पाठविल्या गेलेल्या स्त्रिया, मजूर यांना शोषणातून बाहेर काढून आणण्याचे लक्षणीय काम सुरू आहे.

        पन्हाळ्यातील या बैठकीला डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर देशभरातील १०० कार्यकर्ते स्वतःचे कार्य व विचार सादर करतील. त्यात दिल्ली, पंजाब, राजस्थान, मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा अनेक स्थानांहून विशेषज्ञ व समाजसेवी असतील.
या बैठकीत विशेष आज पर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन पुढील तीन वर्षांच्या कामाचे नियोजन करण्यात येईल. या चळवळीचे स्वरूप सर्जनशील, सकारात्मक व समाजाभिमुख असून पूर्णतः राजकारणापासून अलिप्त आहे. असे राज देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले.
दि. २५ सप्टेंबर,२०२३ रोजी पन्हाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा ग्रीनलँड रिसोर्ट, आंबवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होईल,
आणि दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार, व मा. ज्ञानेश्वर मुळे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. असे सर्वांना कळविण्यात येते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …