no images were found
आयुध भानुशाली शिकला कबड्डी
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्ये कृष्णाची भूमिका साकारणा-या आयुध भानुशालीने आपल्या अभिनय कौशल्यांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अगदी लहान वयात तो वैयक्तिक विकास करण्याप्रती आणि नवीन कौशल्ये अवगत करण्याप्रती समर्पित आहे. नुकतेच एका महत्त्वाच्या सीनसाठी त्याने कबड्डी खेळाचे तंत्र अवगत केले. सह-कलाकार स्वतंत्र भारत (शमशेरा) यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने खेळासाठी आवश्यक तंत्रे अवगत करत चालू असलेल्या कथानकामध्ये उत्तम परफॉर्मन्स सादर केला. सुरू असलेल्या एपिसोडमध्ये कबड्डी खेळण्यासाठी केलेल्या तयारीबाबत सांगताना आयुध भानुशाली म्हणाला, ”आगामी कथानकामध्ये कृष्णा काही खेळाडूंसोबत कबड्डी खेळताना पाहायला मिळणार आहे. मी हा खेळ कधीच खेळलेलो नाही, ज्यामुळे माझी कबड्डी खेळाचे तंत्र अवगत करत सर्वतोपरी प्रयत्न करण्याची इच्छा होती. आम्ही शूटिंगला सुरूवात केली तसे मला समजले की कबड्डी खेळाडू बनणे सोपे नाही. मला समजले की, प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी खेळामध्ये प्रबळ चातुर्याची गरज असते. मी याबाबत उत्साहित, तसेच तितकाच नर्व्हस होतो. मला सांगावेसे वाटते की, संपूर्ण सीक्वेन्सच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी मला वास्तविक कबड्डीच्या सामन्यामध्ये स्पर्धा करत असल्याचे आणि टीमचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे वाटले. पण हे सर्व विशिष्ट सीनसाठी होते. मी तयारीला लागलो आणि माझी ताकद व स्टॅमिनावर काम करण्यास सुरूवात केली. पण सीनच्या शूटिंगला सुरूवात होताच मला या खेळासाठी विशिष्ट तंत्रांची गरज असल्याचे जाणवले. स्वतंत्र भारत सरांनी मला टॅकल, ब्लॉक, चेन टॅकल, वेस्ट होल्ड, अँकल होल्ड, थाय होल्ड, ड्रायव्हिंग अँकल होल्ड, डुबकी असे अनेक तंत्रे शिकवली. मी ही तंत्रे उत्तमरित्या जाणून घेण्यासाठी ऑनलाइन काही कबड्डी सामने देखील पाहिले. कबड्डी लक्षवेधक खेळ आहे. वास्तविक कबड्डी टर्फवर शूटिंग करण्याचा अनुभव उल्लेखनीय व संस्मरणीय होता. मी बालपणापासून प्रखर प्रशिक्षण घेतलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय कबड्डी खेळाडूंचा आदर करतो.”
सह-कलाकार व प्रशिक्षकासोबतच्या जिवलग नात्याबाबत सांगताना आयुध भानुशाली उत्साहात म्हणाला, ”स्वतंत्र सर आणि मी कबड्डी सीन्सचा सराव करण्यासाठी एकत्र अधिक वेळ व्यतित केला. त्यांनी उत्तमपणे व संयमीपणे खेळातील बारकावे शिकवले. आम्ही सर्वकाही सुरळीत होण्यासाठी प्रत्येक शूटच्या अगोदर दोन ते तीन तास सराव केला. ते अत्यंत शिस्तबद्ध, फिटनेस उत्साही आणि अथक मेहनत घेण्याप्रती समर्पित आहेत. शूटदरम्यान मी त्यांना सलग पन्नास पुश-अप्स मारण्याचे आव्हान दिले आणि त्यांनी अगदी काही मिनिटांमध्येच पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी मला तसे करण्याचे आव्हान केले आणि मी खेळकरपणे ते टाळले (हसतो). मी खेळ शिकण्याच्या व खेळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेतला. माझ्या आई-वडिलांना पडद्यावर मला हा आव्हानात्मक खेळ खेळताना पाहून खूप आनंद झाला. मी आशा करतो की, प्रेक्षक देखील आनंदित होतील. आमची मालिका ‘दूसरी माँ’ कबड्डी सारख्या अंडररेटेड खेळाला चालना देत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे.”