
no images were found
सा रे ग म प च्या कार्यक्रमास माधुरी दिक्षित ,सुरेश वाडकर यांची उपस्थिती
गतवर्षीच्या आवृत्तीच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे दणक्यात पुनरागमन झाले असून त्यात हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अनु मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करत आहे. हा नवीन सीजन आपल्या नवीन फॉर्मेटसह ह्या गेमची रूपरेखा बदलून टाकण्यासाठी सज्ज असून आता नवीन फॉर्मेटमध्ये परीक्षकांतर्फे स्पर्धकांसाठी तात्काळ आव्हान देण्याला सुरूवात करण्यात आली आहे. ह्या नवीन आव्हानात्मक वातावरणामुळे शोमध्ये थोडी हलचल निर्माण झाली असून त्यामुळे स्पर्धकांमधील स्पर्धात्मक चैतन्याला चालना मिळाली आहे. ह्यामुळे प्रेक्षकांनाही प्रत्येक भागामध्ये काहीतरी नवीन सरप्राईज पाहायला मिळत आहे.
देशभरातील प्रतिभावान गायकांच्या सुरेल आवाजांनी ह्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. आता भारतातील टॉप 12 ‘ओजी’ आवाजांसह, रिॲलिटी टेलिव्हिजनच्या क्षेत्रात नवीन इतिहास रचण्यासाठी सा रे ग म प सज्ज आहे. ह्या सीजनमध्ये मूळ सिंगल गाणे रेकॉर्ड करण्याची सुवर्णसंधी ह्या शो ने आपल्या स्पर्धकांसाठी आणली आहे आणि ह्या वचनाला खरे राहून हा शो ऑन एअर गेल्यानंतर केवळ दोन आठवड्यांमध्ये, ह्या शो ने झी म्युझिक कंपनीसोबत आपले पहिले मूळ सिंगल गाणे रेकॉर्ड करण्याची संधी प्रदान करण्यासाठी आपल्या पहिल्या भाग्यशाली गायकाची निवडही केली आहे. शो च्या ग्रॅन्ड प्रीमिअर एपिसोडमध्ये ‘अपना बना ले पिया’ ह्या गाण्याच्या जबरदस्त सादरीकरणाने परीक्षकांना थक्क केलेला पश्चिम बंगालच्या अल्बर्ट काबो लेप्चा हा ही अविश्वसनीय संधी मिळवणारा पहिला स्पर्धक ठरला आहे.
स्पर्धक अल्बर्ट काबो लेप्चा म्हणाला, “माझे पहिले मूळ गाणे रेकॉर्ड करण्याची ही अप्रतिम संधी आहे आणि मी खरंच खूप उत्साहात आहे. सा रे ग म प च्या परीक्षक, झी टीव्ही आणि झी म्युझिक कंपनीचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी माझी कला ओळखली आणि मला ही संधी प्रदान केली.”
ह्या वीकेन्डच्या आगामी एपिसोड्समध्ये बॉलिवूड आयकॉन माधुरी दिक्षित ह्या मंचावर उपस्थित असेल आणि ख्यातनाम गायक सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्यासह खास ‘गणेश चतुर्थी’ सेलिब्रेशनही असेल.