no images were found
जीजेएस प्रदर्शनासाठी सराफ व्यावसायिकांना नोंदणीचे आवाहन
कोल्हापूर – मुंबई येथे जीजेसीच्या वतीने होणाऱ्या जीजेएस या दागिन्यांच्या प्रदर्शनासाठी व्यावसायिकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन भरत ओसवाल, राजेश राठोड, विजय हावळ यांनी केले आहे.
मुंबई येथे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) वतीने ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर असे चार दिवस चालणारा इंडिया जेम अँड ज्वेलरी शो (जीजेएस) जीओ कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित केला आहे. देशभरातील दागिने येथे एकाच छताखाली दसरा, दिवाळी आणि लग्नसराईसाठी सर्वांना पाहता येतील.
दरम्यान, आपल्या पारंपरिक व्यवसायाला नवतंत्रज्ञानाची जोड देताना, अशा प्रदर्शनांना भेट देऊन आपल्या व्यवसायाच्या कक्षांचा विस्तार करा, असे आवाहन जीजेसीचे विभागीय सदस्य भरत ओसवाल यांनी केले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले की, प्रदर्शनाला जाण्यासाठी बसची सुविधा आहे. उपाध्यक्ष विजय हावळ म्हणाले की, फक्त कोल्हापूर जिल्हाच नाही तर सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, गोवा, बेळगाव येथील आपल्या व्यावसायिकांना प्रदर्शनासाठी भेट देण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोल्हापूर जिल्हा सराफ संघामध्ये सुरेश चौगले यांच्याकडे नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.