no images were found
उत्सव-दे-हंपी ४X४ ऑफ रोड चॅलेंज २०२३ स्पर्धेमध्ये अश्विन शिंदे-कृष्णकांत जाधव जोडीला प्रथम क्रमांक
कोल्हापूर – जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपी येथे कर्नाटक पर्यटन आणि युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाद्वारे प्रायोजित विजयनगरच्या मोटर स्पोर्ट्स अकॅडमीने आयोजित केलेल्या उत्सव दे हंपी २०२३ च्या साहसी आणि थरारक चौथ्या आवृत्तीत कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू अश्विन शिंदे आणि कृष्णकांत जाधव या कोल्हापूरच्या जोडीने 2022 आणि 2023 अशा सलग दोन वर्षांमध्ये स्टॉक पेट्रोल कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमाकांचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे.
हंपी 4X4 ऑफरोड चॅलेंज या 800 गुणांच्या साहसी आणि थरारक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, विजापूर, हसन, कूर, हैदराबाद, बंगळूर, कर्नाटक, गोवा, केरळ अशा विविध ठिकाणांवरून 64 गाड्या सोबत 168 स्पर्धक सामील झाले होते. ही स्पर्धा होस्पेटच्या हद्दीतील तुंगभद्रा धरणाशेजारच्या गुंडा जंगलात पार पडली. यामध्ये 800 पैकी 760 गुणांची कमाई करत या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 800 पैकी 715 गुणांची कमाई करीत द्वितीय क्रमांक प्रदीप आणि संदीप (बंगळूर) या जोडीने तर, 800 पैकी 703 गुणांची कमाई करीत तृतीय क्रमांक प्लबन पटनायक आणि शेल्टोन (गोवा) या जोडीने पटकावला.
विजयी स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी, रोख रक्कम, ऑफ-रोड टायर, व्हील आणि इतर वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विजयी स्पर्धक रोहित गौडा आणि संतोष एच. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांना कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि आजरीज इको व्हॅली यांचे सहकार्य लाभले.