Home शैक्षणिक ट्रक चालकांच्या मुलींना शिक्षणासाठी मिळणार महिंद्रा सारथी अभियान शिष्यवृत्ती

ट्रक चालकांच्या मुलींना शिक्षणासाठी मिळणार महिंद्रा सारथी अभियान शिष्यवृत्ती

7 second read
0
0
36

no images were found

ट्रक चालकांच्या मुलींना शिक्षणासाठी मिळणार महिंद्रा सारथी अभियान शिष्यवृत्ती

 

 कोल्हापुर  : १८ सप्टेंबर २०२३: महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजन (MTBD) तर्फे या ड्रायव्हर्स डे ला महिंद्रा सारथी अभियानाच्या माध्यमातून ट्रक चालकांच्या मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. प्रकल्प महिंद्रा सारथी अभियान या मुलींच्या उच्च शिक्षणाच्या हक्काचे समर्थन करून त्यांचे जीवन बदलण्यासाठी एक छोटेसे योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

महिंद्रा ही पहिल्या काही व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यापैकी एक आहे जिने या उपक्रमाचा पायंडा पाडला आहे आणि निवडक उमेदवारांना त्यांच्या कामगिरीबद्दल १०,००० रुपयांच्या शिष्यवृत्तीसह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला आहे. हा प्रयत्न महिंद्रा ट्रक आणि बस विभागाच्या ट्रक ड्रायव्हर समुदायाप्रती अखंड चालू असलेल्या वचनबद्धतेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. याची सुरुवात २०१४ मध्ये महिंद्रा सारथी अभियानासोबत करण्यात आली होती. संपूर्ण भारतातील ७५ हून अधिक ट्रान्सपोर्ट हब आणि चांगल्या प्रकारे परिभाषित, पारदर्शक आणि स्वतंत्र प्रक्रिया याद्वारे सुरुवातीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आत्तापर्यंत, ८९२८ तरुण मुलींनी या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असून त्यामुळे त्यांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता येतील.

या प्रसंगी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे कमर्शिअल व्हेईकल्सचे बिझनेस हेड श्री. जलज गुप्ता म्हणाले, “महिंद्रा सारथी अभियान व्यावसायिक वाहन परिसंस्थेतील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध असून ड्रायव्हर समुदायाचे जीवन सुधारणे हे उद्दिष्ट आहे. ट्रक ड्रायव्हर्सच्या मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची संधी देण्यासाठी आणि त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांकडे जाण्यासाठी त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा देण्यात आम्हाला आनंद होत आहे. तरुण मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यात प्रभावी भूमिका बजावत असल्यामुळे महिंद्रा सारथी अभियान आमच्या ड्रायव्हर आणि भागीदारांनी उत्साहाने स्वीकारले आहे.”

कंपनीने या शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या प्रत्येक मुलीला १०,००० रुपये थेट बँकेत हस्तांतरित करण्याची आणि या यशाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्याची योजना आखली आहे. महिंद्रा ट्रक आणि बस लीडरशीप इंडिया तर्फे फेब्रुवारी-मार्च २४ मध्ये निवडक ठिकाणी सत्कार आयोजित केला जाईल आणि त्यामध्ये ट्रक चालकांच्या मुलींना ११०० शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…