no images were found
लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले ‘बाहुबली’ विमान, 21 हजार कोटींचा करार. भारतीय लष्कराची ताकत आणखी वाढणार आहे. भारतीय सैन्यात पहिले C-295 टॅक्टिकल मिलिट्री एयर लिफ्ट विमान दाखल होणार आहे. हे विमान स्पेनमधील सेव्हिल प्लांटमध्ये तयार करण्यात आले असून, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी विमानाची डिलिव्हरी घेण्यासाठी स्पेनमध्ये पोहोचले आहेत. हे विमान आग्रा एअरबेसवर तैनात केले जाईल . 9देशात आणल्या जाणाऱ्या या विमानाचे इंडक्शन हिंडन एअरबेसवर होणार आहे. दुसरे C-295 एअर लिफ्ट विमान मे 2024 मध्ये भारतात येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पेनमधून अशी 56 विमाने आणण्याची योजना होती. यातील 16 पूर्णपणे तयार विमाने भारतात येतील, तर गुजरातमधील वडोदरा येथे 40 विमानांची निर्मिती केली जाणार आहे. 2024 पासून हे विमान तयार करण्याचे काम टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम कंपनी करणार आहे. 9C-295 विमानाची वैशिष्ट्ये: शॉर्ट टेकऑफ आणि लँडिंगमध्ये एक्सपर्ट: या विमानात अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे हे इतर ऑपरेशनल विमानांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. उदा: एमर्जन्सीमध्ये विमानाने शॉर्ट टेक-ऑफ आणि लँडिंग करता येते. फक्त 320 मीटर अंतरावरुन टेक ऑफ करण्याची क्षमता असल्याचे स्पॅनिश कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय लँडिंगसाठी केवळ 670 मीटर अंतर पुरेसे आहे.4 / 9डोंगराळ भागात आपत्कालीन ऑपरेशन्ससाठी उपयुक्त: कमी जागेत लँडिंग आणि टेक ऑफ केल्यामुळे हे विमान देशातील डोंगराळ भागात ऑपरेशनसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. लडाख, काश्मीर, सिक्कीम आणि आसाम यांसारख्या डोंगराळ भागांसाठी हे अतिशय योग्य ठरेल. एमर्जन्सीमध्ये बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.5 / 911 तास सतत उड्डाण करण्यास सज्ज: हे विमान 11 तास सतत उड्डाण करण्यास सक्षम आहे. विमानाची लांबी 24.45 मीटर आणि रुंदी 8.65 मीटर आहे. तर पंखांचा विस्तार 25.81 मीटर आहे. याशिवाय 12.69 मीटर लांबीची प्रेशराइज्ड केबिन देण्यात आली असून ती 30 हजार फूट उंचीपर्यंत उडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.6 / 97,050 KG पेलोड उचलण्यास सक्षम: C-295 टॅक्टिकल मिलिट्री एअर लिफ्ट प्लेन 7,050 KG पेलोड उचलण्यास सक्षम आहे. एकावेळी 71 सैनिक, 44 पॅराट्रूपर्स, 24 स्ट्रेचर किंवा 5 कार्गो पॅलेटसह ते उड्डाण करू शकते. यावरून ते देशासाठी किती उपयुक्त ठरेल, याचा अंदाज लावता येईल.7 / 9लोडिंग-अनलोडिंग सुलभ: विमानाच्या मागील बाजूस एक रॅम्प दरवाजा आहे, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत माल लोड करणे आणि उतरवणे सोपे होते. याशिवाय यात टच स्क्रीन स्मार्ट कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय 2 इंजिन त्यात बसवण्यात आले आहेत.8 / 921 हजार कोटींचा सौदा: पहिले C-295 वाहतूक विमान आग्रा एअरबेसवर तैनात केले जाईल. त्याच्या वैमानिकांसाठीचे प्रशिक्षण केंद्रही पुढील वर्षी तयार होईल. सप्टेंबर 2021 मध्ये भारताने C-295 विमानांसाठी युरोपियन कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस सोबत 21 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. 2024 च्या मध्यापर्यंत C-295 विमानांचे उत्पादन गुजरातमधील वडोदरा येथे सुरू करेल. सध्या त्याच्या अंतिम असेंब्ली लाईनचे काम सुरू आहे. पहिले स्वदेशी C-295 विमान 2026 मध्ये तयार होईल. एअरबस आणि टाटाच्या हैदराबाद आणि नागपूर प्लांटमध्ये 14,000 हून अधिक देशी भाग तयार केले जातील आणि अंतिम असेंबलिंगसाठी वडोदरा येथे पाठवले जातील. कंपनी 2031 पर्यंत सर्व 40 विमाने हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे.