no images were found
पंचगंगा स्मशानभूमी स्वच्छतेची पहाणी : माजी पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीची गुरुवारी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली होती. यावेळी त्यांनी आरोग्य विभागास याठिकाणी असलेली खरमाती उचलणे, गवत काढणे व स्क्रॅप हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे हे काम करण्यात आले का नाही याची त्यांनी शुक्रवारी पंचगंगा स्मशानभूमीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने स्मशानभूमीच्या परिसरातील गवत काढण्यात आले होते. खरमाती उचलण्याचे काम सुरु होते. महापालिकेने तातडीने स्मशानभूमीमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर उर्वरीत काम तातडीने पुर्ण करा. स्वच्छतेबाबत दक्ष रहा. आठवडयातून एकदा स्मशानभूमीत स्वच्छता मोहिम राबवा. रस्त्याकडेला पडलेली लाकडे, ओंडके स्थलांतरीत करा अशा सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरिक्षक महेश भोसले उपस्थित होते.