no images were found
सनातन धर्म म्हणजे फक्त पोथ्या, पुराणे, वेद नाही
मुंबई :- सनातन धर्म म्हणजे फक्त पोथ्या, पुराणे, वेद नाहीत. मानवता व शुद्ध आचरण, मातृभूमीचे रक्षण अशा कर्तव्याचे पालन करणे हेसुद्धा धर्मकर्तव्य आहे. आज जो धर्म विकृत व हिडीस स्वरूपात भाजपने समोर आणला त्यापासून देशाला आणि समाजाला धोका आहे. त्यामुळे जगात सनातन धर्माची नाचक्की होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे सनातन धर्मावरील प्रेम उतूमातू लागले आहे. आपण व आपले अंधभक्त म्हणजे हिंदू अशा अंडकोशात ते वावरत आहेत. तामीळनाडूतील द्रमुक पक्षाने सनातन धर्मावर विचित्र टीकाटिपण्या सुरू केल्याने आता ‘इंडिया’ आघाडीचे काय व कसे होणार, अशा चिंता भाजपास पडल्या, पण हाच ‘द्रमुक’ पक्ष कधीकाळी भाजपप्रणीत ‘एनडीए’चाही घटक होता व आज त्यांचे जे धर्मविचार आहेत तेच त्या काळातही होते. द्रमुक ‘एनडीए’त असताना तेव्हा काही झाले नाही. त्यामुळे ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत.
भाजपकडून हिंदुत्वावर भाष्य करण्यात येतं. यावर शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार टीका केली जाते. आजही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावरही सामनातून तोफ डागण्यात आली आहे. मणिपूरमध्ये महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढल्याला व्हीडिओ समाज माध्यमात चर्चेत आला. यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. यावर सामनात भाष्य करण्यात आलं आहे. याच मुद्द्याच्या आधारे भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
सरकार संसदेच्या कर्मचाऱ्यांना मणिपुरी टोप्या घालत आहे व तिकडे मणिपुरातील दोन जमाती एकमेकांना गोळय़ा घालत आहेत.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांचा मात्र सनातन धर्माचा जप सुरू आहे. भाजपास सनातन धर्माची चिंता वाटणे हे ढोंग आहे . भाजपच्या सनातन धर्मात ‘ बीफ ‘ म्हणजे गोमांस वर्ज्य आहे , पण भाजपचे अनेक मंत्री व नेते गोमांस खाण्याचा पुरस्कार करतात .
गोवा तसेच ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री सुरूच आहे . त्यामुळे गोमांस भक्षणासंदर्भात स्वतः भाजप गोंधळात गोंधळ करीत असून इतरांना सनातन धर्माचे धडे देत आहे . हे धडे त्यांनी आधी त्यांच्या आघाडीतील ‘ अण्णा द्रमुक ‘ सारख्या पक्षांना द्यावेत.