no images were found
बेटी बचाओ अभियान अंतर्गत शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठातील बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग, समाजशास्त्र अधिविभाग आणि सकाळ अॅग्रोवन संलग्र शैक्षणिक संस्था एस.आय.आय.एल.सी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील व शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्रवेशित आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘कृषी व्यवसाय व फूड प्रोसेसिंग उद्योग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी शिवाजी विद्यापीठातील मानव्यविद्या हॉल याठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. अमोल बिरारी, कृषी विभाग प्रमुख, एस.आय.आय.एल.सी, पुणे आणि सौ. गंधाली दिंडे उद्योजिका व फूड प्रोसेसिंग तज्ञ, कोल्हापूर हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. श्रीमती पी. बी. देसाई यांनी केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले, विद्याथ्र्यांनी यश मिळविण्यासाठी आपल्या कामामध्ये झोकून देण्याची तयारी दाखवली पाहिजे, कोणतेही यश अशा शॉटकट ने मिळत नसून त्यासाठी कामाची तयारी, जिद्द व सकारात्मक दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये केवळ पारंपारिक
शिक्षणाबरोबर कौशल्ये विकसित करणे देखील आवश्यक आहे. विद्यापीठ विद्याथ्र्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी नेहमीच तत्पर असून विविध प्रशिक्षण देण्यावर भर देत असते. याप्रसंगी वक्ते म्हणून श्री. अमोल बिरारी मार्गदर्शन करत असताना, भारतामध्ये शेती क्षेत्रातील असणाऱ्या संधी याबाबत त्यांनी सांगितले. शेतीमधील संधी मिळविण्यासाठी विविध कौशल्य विद्याथ्र्यांनी आत्मसात करावीत व अशा कौशल्य देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. सौ. गंधाली दिंडे यांनी देखील वक्ते म्हणून अन्नप्रक्रिया क्षेत्रातील असणाऱ्या विविध संधीची विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व त्यांनी आदिवासी दृर्गम भागातील उभारणी केलेल्या उद्योगाबाबत अतिशय योग्य पध्दतीने विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली त्यामुळे उद्योजक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल मार्गदर्शन ठरले. डॉ. प्रकाश राऊत यांनी शिवाजी विद्यापिठात कार्यरत असणाऱ्या इनक्युबेशन केंद्राची माहिती दिली.
श्री. तुषार राऊत, उद्योजक, तुषार मसाले हे यशस्वी उद्योजक म्हणून कसे घडलो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री. अमित मांजरे, वरिष्ठ व्यवस्थापक-कृशी विभाग, एस.आय.आय.एल.सी, पुणे यांनी मानले. यावेळी डॉ. प्रतिमा पवार, अधिविभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, प्रा. डॉ. जगन कराडे, श्री. स्वप्निल साखरे, स्वप्निल मानगावे त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक व कृषी क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन उज्वला पाटील यांनी केले.