
no images were found
आफताबचा माझ्या प्रॉपर्टीवर डोळा म्हणून श्रद्धाची हत्या केली; विकास वालकर यांचा आरोप
मुंबई : आफताबच्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त करून आफताबने व्यवस्थित नियोजन करून श्रद्धाला अडकवलं आणि तिची हत्या केली, असं विकास वालकर यांचं म्हणणं आहे.
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाबद्दल भाष्य केलं आहे. श्रद्धा हत्याकांडामुळे सगळा देश हादरला आहे. या प्रकरणातला आरोपी आफताब पुनावाला सध्या कोठडीत आहे. आता श्रद्धाच्या वडिलांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
आफताबने पूर्ण नियोजन करून आपल्या मुलीचं ब्रेनवॉश केलं, तसंच आपल्या मालमत्तेवर आफताबची नजर असल्याचंही विकास वालकर यांनी म्हटलं आहे. आफताबला भेटल्यानंतर आपल्या मुलीच्या वागण्या-बोलण्यात खूप बदल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ती आफताबशी बोलण्यात इतकी गुरफटून जायची, की घरच्यांना उलट उत्तरं द्यायची. तेव्हाच मला कळलं होतं की आफताब माझ्या मुलीला कुटुंबाविरोधात भडकवत आहे, असंही वालकर यांनी सांगितलं.