Home राजकीय आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी; सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांची मागणी

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी; सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांची मागणी

0 second read
0
0
30

no images were found

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी; सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांची मागणी

पटना : “जसं मी बातम्यांमध्ये पाहिलं की दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेचं नाव येत आहे. खरं कारण एसआयटीच्या चौकशीतूनच समोर येईल. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी” अशी मागणी सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी केली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारनं दिले आहेत. यावरुन हिवाळी अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु होता. या वादात आता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी मागल्या महाविकास आघाडी सरकारवरही गंभीर आरोप केला आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह म्हणाले, की, “जसं मी बातम्यांमध्ये पाहिलं की दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेचं नाव येत आहे. खरं कारण एसआयटीच्या चौकशीतूनच समोर येईल. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी”
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करताना सिंह म्हणाले, “हे यापूर्वीच व्हायला हवं होतं, परंतु, त्यावेळी सरकार दुसरं होतं त्यामुळं हे होऊ शकलं नाही. आत्ताच्या सरकारनं घेतलेला निर्णय योग्य आहे. गेल्या सरकारमध्ये चौकशी योग्य प्रकारे यामुळं झाली नाही कारण या प्रकरणात तेच लोक यामध्ये सामिल होते”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…