
no images were found
लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब
नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहेत. निश्चित कालावधीपेक्षा सहा दिवस आधीच अधिवेशन गुंडाळण्यात आल्याची यामुळं चर्चा होत आहे. ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या १७ कामकाजांच्या दिवसांत यंदा अधिवेशन पार पडणार होतं.
तथापि, लोकसभा आणि राज्यसभेच्या बिझनेस अॅडव्हाझरी काऊन्सिल कामकाज सल्लागार परिषदेच्या बैठकीत अचानकपणे हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमेवर अर्थात एलएसीवर दोन्हीकडील सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चर्चेसाठी विरोधीपक्षांकडून वारंवार सभागृहात गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळं गुरुवारी लोकसभेच कामकाज पाच वेळा स्थगित करावं लागलं होतं. यापार्श्वभूमीवर कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्यानं अनिश्चित काळासाठी ते थांबवण्यात आलं आहे. तसेच, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहाचं कामकाज थांबवताना त्यांनी आगामी ख्रिसमस, पोंगल, लोहरी आणि इतर सणांच्या सदस्यांना सदिच्छा दिल्या. तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांबद्दल सतर्क राहण्याचं आवाहनही केलं आहे .