no images were found
कलाकारांनी दिला त्यांच्या आजी-आजोबांसोबतच्या प्रेमळ क्षणांना उजाळा
जीवनातील सर्वात सुरेख नाते म्हणजे आजी-आजोबा व नातवांमधील नाते. आजी-आजोबांचे जीवनातील अनुभव, गाथा व ज्ञानामधून बहुमूल्य शिकवणी मिळतात, ज्या आपल्या वैयक्तिक विकासामध्ये योगदान देतात. तसेच त्यांचे आपल्यासोबत मैत्रीपूर्ण नाते देखील आहे, ज्यामधून संस्मरणीय क्षणांची निर्मिती होते. यंदा इंटरनॅशनल ग्रॅण्डपॅरेंट डे निमित्त एण्ड टीव्ही कलाकार अद्भुत किस्से सांगत आहेत, जेथे त्यांचे आजी-आजोबा त्यांच्या खोडकरपणामध्ये सोबती बनले. हे कलाकार आहेत. मोहित डागा (अशोक, ‘दूसरी माँ’), संजय चौधरी (कमलेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘दूसरी माँ’मधील मोहित डागा ऊर्फ अशोक म्हणाले, ”माझे आजोबा मला शाळेतून नेण्यासाठी यायचे आणि मी त्यांच्या ट्रकमधून प्रवास करण्याचा आनंद घ्यायचो. ते आसपास असले की मी निश्चिंत व नेहमी आनंदी असायचो. असे वाटते की, ते दिवस कालच घडून गेले आहेत. माझे आजोबा मला प्रेमाने गुदगुदल्या करायचे, मला खदखदून हसवायचे. ते खोडी काढण्यामध्ये माझ्यासोबत असायचे. घरी जाऊन माझे शूज काढायचो (ज्याबाबत माझे आजोबा नेहमी विनोदी टिप्पणी करायचे) आणि त्यानंतर आम्ही मिठाई, पानीपुरी व त्यांच्या आवडत्या स्नॅकचा मनसोक्त आस्वाद घ्यायचो, जी आमची सवय बनली होती. माझे आजोबा चित्रपटप्रेमी होती. आम्ही चित्रपट पाहत रात्र व्यतित करायचो. मी रात्रभर जागे राहण्यासाठी माझी आजी त्यांना ओरडायची, पण मी गुपचूपपणे चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यायचो आणि त्यामधून माझी अभिनयाप्रती आवड वाढत गेली. माझ्या आजोबांसोबतचे हे क्षण मला खूप आवडतात आणि ते सदैव माझ्या आठवणीत राहतील. आपण सर्व आज जे कोणी आहोत ते घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व आजी-आजोबांना मी मनापासून नमन करतो.”