no images were found
एखादी सासू एका मुलीला आपली भावी सून म्हणून वाढवू शकते का?
गेल्या तीन दशकांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा अनेक सुरेख कथा सादर केल्यानंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी आता ‘क्योंकि… सास माँ, बहू बेटी होती है’ ही आणखी एक नवी विचारप्रवर्तक मालिका प्रसारित करणार आहे. मालिका प्रेक्षकांना गुजरातमध्ये घेऊन जाईल. नवरात्रीच्या उत्सवादरम्यान पालनपूरमधील राजगौर कुटुंबात सून हेतल घटस्फोटाची मागणी करते, त्यामुळे नवे वादळ घोंघावू लागते. या मागणीमुळे ती सुनेच्या पारंपरिक नात्यालाच आव्हान देते. या घटनेमुळे राजगौर कुटुंबातील सर्वात मोठी सून आणि कुटुंबप्रमुख अंबिका ही मनातून कोसळते. सारे कुटुंब एकत्र राखण्याची जबाबदारी तिच्या डोक्यावर असते. ‘सास कभी माँ और बहू कभी बेटी नहीं बन सकती’ या धाकट्या जावेच्या ठाम भूमिकेमुळे राजगौर कुटुंबियांच्या मालकीच्या अनाथालयात दाराशी सोडण्यात आलेल्या केसर नावाच्या एका अनाथ मुलीला अंबिका दत्तक घेते. पण ती तिला एक मुलगी म्हणून नव्हे, तर सून म्हणून वाढवण्याचा निर्णय जाहीर करते. केसरच्या मनात आदर्श सुनेचे सर्व गुण बिंबवण्याचा अंबिकेचा प्रयत्न असतो, ज्यामुळे मोठी झाल्यावर केसर तिच्या कुटुंबाला एकत्र राखू शकेल. ‘गुरुदेव भल्ला स्क्रीन्स एलएलपी’ कंपनीची निर्मिती असलेल्या या मालिकेचे प्रसारण येत्या 18 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना आपल्या रंजक कथानकात गुंतवून ठेवणार असून ती दररोज संध्याकाळी 6.30 वाजता ‘झी टीव्ही’ वाहिनीवरून प्रसारित केली जाईल.
मानसी जोशी-रॉय आणि नाविका कोटिया यासारख्या नामवंत कलाकारांच्या भूमिका असलेल्या या मालिकेचे कथानक सुरत या सुंदर शहरात घडते. अभिनेत्री मानसी जोशी-रॉय ही या मालिकेत कणखर मनाच्या अंबिकेची मध्यवर्ती व्यक्तिरेखा उभी करणार आहे. ‘नए विचारों के साथ आगे बढना अच्छा है, लेकिन हमें अपने बरसों से चले आ रहे संस्कारों को कभी नहीं भूलना चाहिेए,’ हे तिच्या जीवनाचे तत्त्व असते. ती केसर या अनाथ बालिकेला दत्तक घेऊन तिला वाढविते. केसरची संमती असेल, तर आपल्या मुलाशी तिचे लग्न लावून देण्याचा अंबिकाचा विचार असतो. अर्थात हे दोघेही कळते-सवरते झाल्यावरच ती असे करणार असते. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात आपल्या भूमिकेचा ठसा उमटविणारी नाविका कोटिया यात केसरची व्यक्तिरेका साकारणार आहे. केसर ही लाघवी मुलगी असते. ती महत्त्वाकांक्षी असते, पण आपल्या स्वप्नांना ती आपल्या कुटुंबियांच्या स्वप्नांशीच संलग्न करते. ‘या तो जीत लोगे या तो सीख लोगे’ अशी तिच्या मनाची धारणा असल्याने ती कधीच हार मानत नाही.
या मालिकेच्या पहिल्या प्रोमोचे प्रसारण झाल्यापासूनच तिच्याबद्दल सामाजिक माध्यमांवर चर्चेला सुरुवात झाली आहे. या मालिकेची माहिती अलिकडेच मुंबईतील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींपुढे देण्यात आली. यावेळी मालिकेतील कलाकारांनी देवी अंबे माँची महाआरती केली. त्यानंतर पत्रकारांना मालिकेच्या सेटवर फेरफटका मारण्यासाठी नेण्यात आले. यावेळी त्यांना सुरतहून मागवलेल्या स्वादिष्ट पारंपरिक गुजराती पदार्थांचा आस्वादही घेता आला.