
no images were found
अनु मलिक ला दिसली आशाजी आणि लताजींची झलक
गतवर्षीच्या आवृत्तीच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे दणक्यात पुनरागमन झाले असून त्यात हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अन्नू मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे. ‘सा रे ग म प 2023’च्या अंतिम 12 स्पर्धकांमध्ये समावेश होण्यासाठी देशभरातील अनेक होतकरू इच्छुकांच्या सुरेल ऑडिशन्सनी या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला असला, तरी काही स्पर्धकांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याबद्दलच्या प्रेमाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अशाच दोन स्पर्धक निष्ठा शर्मा आणि रोनिता बॅनर्जी यांनी अप्रतिमपणे एकत्रित गायलेल्या ‘मोसे छल किये जाय’ आणि ‘घर मोरे परदेसिया’ या द्वंद्व गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांची ही कामगिरी पाहिल्यानंतर सर्वांनी त्यांचे कौतुक केले आणि सर्व परीक्षकांनीही त्यांची प्रशंसा केली. पण परीक्षक अनु मलिकने या दोघींची तुलना जिवंतपणी आख्यायिका बनलेल्या आशा भोसले आणि दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी केली.
अनु मलिक म्हणाले, “सा रे ग म पच्या व्यासपिठावर इतक्या अपवादात्मक गुणी गायिकांची गाणी ऐकणे ही खूपच छान गोष्ट आहे. तुम्ही दोघीही खूपच अफलातून गायिका आहात आणि तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने गाणी सादर केली. आता या मंचावरून खाली उतरण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे आणि ती म्हणजे निष्ठा आणि रोनिता या सा रे ग म प कार्यक्रमाच्या अनुक्रमे आशा आणि लता आहेत.”
नीति मोहन म्हणाली, “तुमची गाणी ऐकल्यावर आम्ही सर्वांनी हे ठरवलं आहे तुम्ही दोघी या सुवर्णपदकाच्या मानकरी आहात. शिवाय मी म्हणेन की ऑडिशन्स आणि मेगा ऑडिशन्सच्या फेर््यांमधील तुमच्या अप्रतिम कामगिरीमुळे सा रे ग म प या कार्यक्रमाची शान अधिकच वाढली आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो.”
आपल्या बहारदार कामगिरीने निष्ठा आणि रोनिता यांनी सर्वांची मने जिंकली असली, तरी ‘सा रे ग म प’च्या अन्य स्पर्धकांना गाताना ऐका. त्यांची कामगिरी ऐकताना तुम्ही टीव्हीच्या पडद्याला खिळून राहाल.