
no images were found
टीव्ही कलाकारांचे त्यांच्या मूळगावामधील जन्माष्टमी साजरीकरण
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त जन्माष्टमी सण जल्लोषात साजरा केला जातो. जगभरातील लोक हा सण विविध पद्धतीने साजरा करतात. एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या मूळगावांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या या सणाच्या उत्साहाबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ‘दूसरी माँ‘मधील आयुध भानुशाली (कृष्णा), नेहा जोशी (यशोदा), आरजे मोहित (मनोज), मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मधील गीतांजली मिश्रा (राजेश), चारूल मलिक (रूसा) आणि मालिका ‘भाबीजी घर पर है‘मधील शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी), सानंद वर्मा (अनोखे लाल सक्सेना). मालिका ‘दूसरी माँ‘मधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्हणाल्या, ”महाराष्ट्रात जन्माष्टमी सण उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. दही, दूध, फळे व गोड पदार्थांसह भरण्यात आलेली दहीहंडी फोडण्यासाठी लोक गोविंदाचे थर रचतात. संपूर्ण महाराष्ट्रात जन्माष्टमीचा जल्लोष असतो. नाशिकमध्ये मोठी झाली असल्याने मी दहीहंडी फोडण्याचा अनुभव जवळून पाहिला आहे. प्रत्येक नाक्यावर लोक दहीहंडी फोडण्यासाठी गोळा व्हायचे आणि आम्ही लहान मुले त्याचा एकही क्षण चुकवायचो नाही. आम्ही इकडेतिकिडे फिरायचो, दहीहंडी फोडण्यामध्ये कोणता गोविंदा यशस्वी ठरेल याची उत्सुकतेने वाट पाहायचो. वातावरण अगदी उत्साहपूर्ण असायचे, मंदिर सजवले जायचे आणि भक्तीमय गाणी लावली जायची. पण मला ढोलाच्या तालावर नाचायला आणि सोबत ‘गोविंदा आला रे आला‘ म्हणायला आवडायचे. तसेच मी माझ्या आईने प्रेमाने बनवलेली पुरणपोळी व पारंपारिक घरगुती पदार्थांचा आस्वाद घ्यायचे.” मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”जन्माष्टमी सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो, पण उत्तर प्रदेशमध्ये या सणाचा उत्साह अत्यंत जल्लोषपूर्ण असतो. मी स्वत: यापूर्वी या सणाचा उत्साहात आनंद घेतला आहे. मथुरामधील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरामध्ये अनेक भक्त सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात. हौशी कलाकार श्रीकृष्णाची रासलीला सादर करतात, ज्यामुळे संपूर्ण शहर उत्साहपूर्ण होऊन जाते. यातील काही परफॉर्मन्स इतके लक्षवेधक असतात की, भक्त श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रमून जातात. माझे मूळगाव वाराणसीमध्ये जल्लोषात सण साजरा केला जायचा. माझी आजी मलाई पेढा, चर्णामृत व धनिया पंजिरी असे खास प्रसाद तयार करायची आणि भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायची. तसेच आम्ही मंदिरांमध्ये जाऊन हा घरगुती प्रसाद सर्वांना द्यायचो आणि तेथे सादर केले जाणाऱ्या भजनांमध्ये सामील व्हायचो. बालपणी मी माझ्या आईकडे राधासारखा पोशाख देखील मागितला होता आणि मला तो पोशाख परिधान केल्यानंतर खूप आनंद व्हायचा. भगवान श्रीकृष्ण आपणा सर्वांवर प्रेम व कृपेचा वर्षाव करत राहो. सर्वांना जन्माष्टमीच्या आनंदमय शुभेच्छा.”