no images were found
गणेशोत्सव मंडळावर नोंद झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन – सकल हिंदू समाज
कोल्हापूर – येथील ‘वाय.पी. पोवार नगर मित्र मंडळा’च्या श्रीगणेशमूर्ती आगमन मिरवणुकीत पारंपारिक वाद्ये वाजवली, वाहतूक कोंडी केली म्हणून जुना राजवाडा पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांना मशिदींवरील भोंगे हटवण्याचे, मजारींचे अवैध बांधकाम पाडण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवत नाही; मात्र केवळ हिंदूंच्या उत्सवात मिरवणुकीत कायद्याचे नाव पुढे करून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी भावना सकल हिंदू समाजाची होत आहे. तरी यापुढील काळात हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुका काढण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केला जाऊ नये, तसेच गणेशोत्सव मंडळावर नोंद झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्कर, सेवाव्रत प्रतिष्ठानचे श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, युवासेनेचे श्री. भाऊ चौगुले, श्री. सुशील भांदिगरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. आबा जाधव उपस्थित होते.