Home क्राईम जालना येथे आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्या बांधवांवर झालेली लाठीमाराची चौकशी करा  – सकल हिंदू समाजाचे निवेदन

जालना येथे आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्या बांधवांवर झालेली लाठीमाराची चौकशी करा  – सकल हिंदू समाजाचे निवेदन

3 second read
0
0
74

no images were found

जालना येथे आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्या बांधवांवर झालेली लाठीमाराची चौकशी करा  – सकल हिंदू समाजाचे निवेदन

कोल्हापूर – नुकतेच जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या, उपोषणास बसलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात असंख्य कार्यकर्ते घायाळ झाले. याचा सकल हिंदू समाज तीव्र निषेध करत आहे. तरी लाठी आक्रमणाचा आदेश देणारे अधिकारी, राजकीय नेते यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले. सकल हिंदू समाज मराठा समाजाच्या या आंदोलनाविषयी सक्रिय सहभागी असून पूर्ण शक्तीनिशी सकल मराठा समाजाच्या मागे उभा आहे आणि राहील, असेही त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्कर, सेवाव्रत प्रतिष्ठानचे श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, युवासेनेचे श्री. भाऊ चौगुले, श्री. सुशील भांदिगरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. आबा जाधव उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…