no images were found
शहरात कालपासून 40 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व प्लॅस्टीक कचरा उठाव
कोल्हापूर : पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत कालपासून 40 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व प्लॅस्टीक कचरा उठाव करण्यात आला आहे. हि मोहिम पंचगंगा तालीम परिसर, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, लक्ष्मी नाराण मंदिर, जयंती नाला पंपीग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळ, कारजगे मळा, रमणमळा मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतारावाडा या परिसरामध्ये राबविली जात आहे. यासाठी 3 जेसीबी, 6 आयवा डंपर, 2 फायर फायटर, 2 पाण्याचे टँकर, औषध फवारणीचे 5 टॅक्टर, धूर फवारणीची 9 मशिन व 20 हॅन्ड पंप, ठाणे व नवी मंबई महापालिकेचे जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनच्या सहाय्याने व महापालिकेच्या 300 सफाई कर्मचा-यामार्फत राबविली जात आहे.
हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गर्दानाखाली मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार व सर्व आरोग्य निरिक्षक यांच्या मार्फत राबविली जात आहे.