no images were found
4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
कोल्हापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याच्या दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.
लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा. अर्ज स्वीकृती निकष पुढील प्रमाणे-अर्ज विहित नमुन्यात असावा. (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, चारही स्तरावरील लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवाश्यक, तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनांनतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेल अर्ज. अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर विहित नमुन्यात करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.