no images were found
रियटर इंडिया: विंग मॅन्युफॅक्चरिंग साइटवर सुरु असलेल्या स्ट्राइकवर विधान व्यवस्थापनाची भूमिका
सातारा : रियटर इंडिया विंग येथे दिनांक २६ जुलै २०२३ पासून युनियनने संप पुकारलेला आहे. या युनियन ला न्यायालयाने अधिकृत मान्यता दिलेली नाही. रियटर इंडिया हि कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तम / उत्कृष्ट / पोषक / कामकाजाचे वातावरण देण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच कर्मचाऱ्यांना योग्य तो लाभ व सुविधा मिळाव्या याकरिता कंपनी सदैव तत्पर असते. कंपनी मध्ये राष्ट्रवादी महाराष्ट्र, जनरल, कामगार, युनियन (RMGKU) हि अधिकृतपणे मान्यताप्राप्त युनियन आहे व सदर युनियन बरोबर व्यस्थापन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करते.
रियटर इंडिया प्रा. लि. ही स्विझर्लंड येथील रियटर ग्रुप यांची भारतातील उपकंपनी आहे. रियटर ग्रुप हा २२५ वर्षा पेक्षा जास्त जुना ग्रुप आहे. या ग्रुपच्या जगभरात अनेक देशांत शाखा आहेत. आपल्या शिरवळ परिसरातील ही एक नामांकित आणि नावाजलेली कंपनी आहे.
रियटर इंडिया ने कर्मचार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोविड १९ महामारीच्या कठीण काळात व कंपनीच्या बिकट आर्थिक परिस्थितीच्या काळातसुद्धा कंपनीने कर्मचाऱ्यांची काळजी घेत कोणतीही नोकर कपात न करता संपूर्ण कालावधीचा पगार दिलाच तसेच शक्य होईल तेवढी पगारवाढ सुद्धा दिली.
रियटर कंपनीमध्ये राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार यूनियन ही मान्यताप्राप्त यूनियन आहे. कायद्यानुसार केवळ मान्यताप्राप्त युनियनला वेतन वाटाघाटी, सेवा शर्ती इत्यादी विषयांवर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा एकमेव अधिकार आहे. रियटर इंडिया एम्प्लॉईस फेडेरेशन (फेडेरेशन यूनियन) ही मान्यताप्राप्त यूनियन नसल्यामुळे कायदेशीर रित्या कंपनीला फेडेरेशन यूनियन सोबत या बाबतीत कोणतीही चर्चा करता येत नाही.
संपा पूर्वी रियटर वयवस्थापनाने केलेल्या सर्व आवाहनांना न जुमानता, नव्याने स्थापन झालेल्या युनियनच्या सदस्यांनी याबाबतीत कोणताही संवाद साधण्यास नकार दिला आणि कंपनीच्या सुरळीत कामकाजात व्यत्यय आणला. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी २५ दिवस संप केला आणि २६ जुलै २०२३ रोजीपासून त्यांनी परत संपाला सुरुवात केली आहे. मा. दिवाणी न्यायालयाने कंपनीच्या ५०० मीटरच्या परिघात इतर कर्मचार्यांना अडथळा आणण्यापासून युनियन कर्मचार्यांना प्रतिबंधित करणारा आदेश जारी केला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हणजे खंडाळा तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक फलटण आणि पोलीस निरीक्षक शिरवळ यांनी बोलावलेल्या बैठकीला रियटर इंडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते, आणि त्यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली. तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षक यांनी निदर्शने करणार्या कर्मचार्यांना सांगितले की रियटर इंडियाने कायद्याच्या अधीन राहुन काम केले आहे व आंदोलन करणार्या कर्मचाऱ्यांनी देखील कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले आहे व कायदयाचे उल्लंघन केल्यास आंदोलन करणार्या कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाही केली जाईल अशी समज दिली.
श्री. अनिल कुडाळ, व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ, रियटर इंडिया, यांनी सांगितले की “आम्ही आमच्या कर्मचार्यांना त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशिक्षण आणि विकासाच्या संधी देत असतो तसेच आम्ही आमच्या कर्मचार्यांना चांगल्यातल्या चांगल्या सोई सुविधा, विविध फायदे आणि त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या व्यावसायिक धोरणाचा भाग म्हणून ,रियटर आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या स्वयं-विकासासाठी व उच्च-कौशल्य आणि आमच्या वर्तमान आणि भविष्यातील कौशल्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे अद्यावत प्रशिक्षण देतो. सर्वांचा फायदा लक्षात घेऊन सर्वांसोबत योग्य तो संवाद योग्य वेळी साधने ही आमच्या कंपनीची संस्कृती आहे. तथापि, आमची अपेक्षा आहे की आमच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यापरीने कंपनीच्या यशामध्ये भागीदार होऊन कर्मचाऱ्यांचा , ग्राहकांचा आणि समाजाचा विकास व्हावा यासाठी योगदान द्यावे. बेकायदेशीर निदर्शने , निषेध आणि संप करणार्या कर्मचार्यांच्या वैयक्तिक धमक्यांमुळे व्यवस्थापनाला बेकायदेशीरपणे संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बरोबर पुढील चर्चा करणे अशक्य आहे.