no images were found
तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे मोफत आयोजन
कोल्हापूर : सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत व विद्यावेतनासह असलेले तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम तालुकानिहाय आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी कळविले आहे की,
यामध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग, फुड प्रॉडक्ट आणि मसाले मेकिंग, हेअर अँड स्किनकेअर (ब्युटीपार्लर), ग्राफिक्स डिझायनिंग, कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी, गडहिंगलज- सी.सी.टी.व्ही. इंनस्टॉलेशन टेक्नीशियन, आजरा- फुड प्रॉडक्ट व मसाले मेकिंग चंदगड- फॅशन डिझायनिंग, राधानगरी- दुचाकी वाहन दुरूस्ती, भुदरगड- फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींना तांत्रिक प्रशिक्षणासह उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार- रोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा कार्यक्रमाच्या आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षकीय प्रशिक्षणा शिवाय उद्योजकता विकास प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना व कर्ज प्रकरण तयार करणे, बँकेचे व्यवहार, प्रकल्प अहवाल तयार करणे. ई. विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम हे संपूर्णतः मोफत असून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करण्याऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.
निवड समिती मार्फत प्रत्यक्ष मुलाखतीमधून प्रशिक्षणार्थीची कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी किमान ७ वी पास, किंवा पदवी / पदविका, वयोगट १८ ते ४५ तसेच जिल्ह्यातील रहिवासी असावा. त्याशिवाय कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा. कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी शैक्षणिक कागदपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे नावे असलेले बँक खाते पासबुकाची सत्यप्रत व दोन फोटो सह एम.सी.ई.डी. कार्यक्रम सहयोगी वंदना घाटगे- ९५५२७४७६२९, राधा मेस्त्री- ९३२६६६२७१७. किंवा जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे- ९४०३०७८७७४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.