no images were found
जी-२० आणि पर्यावरणपूरक जीवनशैली
कोल्हापूर – शिवाजी विद्यापिठाच्या इंग्रजी अधिविभागाच्या मार्फत नुकतेच उद्योजिका आणि पर्यावरणवादी डॉ.प्रमिला बत्तासे यांचे G20 चे प्रतिनिधित्व आणि यु.जी.सी च्या युनिव्हर्सिटी कनेक्ट चा एक भाग होता.सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.तृप्ती करेकट्टी या होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत लंगरे यांनी केले.सूत्र संचालन पार्थ यादव यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सचिन कामात यांनी केले आणि G20 भारताचे प्रतिनिधित्व या बाबत सविस्तर माहिती दिली.या कार्याक्रामासाठी हिंदी व इंग्रजी आधीविभागातील शिक्षक,सौशोधक विध्यार्थी व विध्यार्थी उपस्थीत होते.या वेळी बोलताना डॉ.प्रमिला भात्तसे यांनी G20 आणि पर्यावरण पूरक जीवनशैली या वर आपले अभ्यासपूर्ण व्याक्यान आपल्या व्याक्यानात त्या म्हणाल्या आपल्या प्रत्येकांनी शाश्वत पर्यावरण जीवनशैलीचा स्वीकार केला, तर पर्यावरणाचं संरक्षण तर होईलच पण येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगल भवितव्यही देऊ शकतो. यासाठी प्रत्येकाची छोटी कृतीही महत्वाचं पाऊल ठरू शकते. आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणीय जीवन पद्धतींचा अवलंब केला, तर पृथ्वीचे चांगले संरक्षण केलं शकतs. यासाठी सर्व सामाजिकघटकांनी काही शाश्वत पर्यांयाची निवड करण्याची आवश्यकता आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आणि जैवविविधतेच नव्हे; तर आपल्या येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठीही महत्त्वाचं आहे. यासाठी अक्षय ऊर्जा, कचरा कमी करणे,जैवविविधतेला प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीसाठी आपल्या सगळयांच्या सामूहिक प्रयत्नांची खूप गरज आहे.G20 हा एक चांगले निमित्त आहे.
यामुळे आपल्याला शाश्वत पर्यावरण जीवनशैली स्वीकारण्यासाठी, हिरव्यागार वसुंधरेसाठी आणि स्वच्छ जगासाठी प्रेरणा मिळते. यासाठी तुम्ही पर्यावरणीय शाश्वत भविष्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ पद्धतीचा अवलंब करायला हवा. यामध्ये जुन्या वापरात नसलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करणे, टाकाऊ वस्तूचे सुंदर आणि कलात्मक वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही तुमच्या घरातील एका अडगळीत पडलेलं फर्निचर,कपडे, जुनी खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू इत्यादी. याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे घरातील कचरा तर कमी होतो टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा निर्माण करणे हे शाश्वत जीवनशैलीतील एक महत्वाचं पाऊल ठरू शकते. त्या पुढे म्हणाल्या शाश्वत पर्यावरणासाठी आपल्या घरापासून आपण एक छोटीशी सुरूवात करू शकतो. आपण गावी राहत असू तर अंगणात आणि शहरात राहत असू तर टेरिसवर हिरव्यागार बागेची उभारणी करू शकतो. यामुळे शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यासाठी जैवविविधतेचं संरक्षण होईल,पर्यावरणाला फायदेशीर ठरतील अशा वनस्पतींच्या रोपांची लागवड करायला हवी. या रोपांसाठी सेंद्रिय खतांचा वापर करा. यामुळे मातीचे पोषण तर होईलच आणि पर्यावरणालाही लाभ होईल. विविध रंगी फुलांची झाडे आणि घराच्या सभोवती हिरव्यागार झाडांमुळे घराच्या सौंदर्यात भर पडते. यासोबत निसर्ग सान्निध्यात राहिल्यामुळे मन प्रसन्न राहते. तसेच पर्यावरणालाही छोटासा पण महत्त्वाचा हातभार लागू शकतो.