
no images were found
आदराने फोटो लावला म्हणून कोणी कोर्टात जात का; छगन भुजबळ
फोटो वापरण्यावरून शरद पवारांनी अलीकडेच अजित पवार गटाला इशारा दिला आहे. बॅनर आणि इतर ठिकाणी माझा फोटो वापरल्यास मी न्यायालयात जाईन, असा इशारा शरद पवारांनी दिली. शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यानी प्रतिक्रिया दिली.
“बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरल्यास ते कोर्टात जाणार आहेत, असं वाचलं. पण सुरुवातीच्या काळात शरद पवार स्वत: म्हणाले होते की, मी कोर्टबाजी करणार नाही. आता फोटोवरून ते कोर्टात जाणार असं म्हणाले. पण फोटोची विटंबना झाली म्हणून कोर्टात गेलेली अनेक उदाहरणं आहेत. परंतु कुणीतरी आदराने आपला फोटो लावला, म्हणून कुणी कोर्टात गेलंय, असं उदाहरण मी पाहिलेलं नाही.”