
no images were found
सिबिक इन्स्टिट्यूट कोल्हापूर मधील सर्व विभाग “सर्वोत्तम” श्रेणीने मानांकित
कोल्हापूर : सिबिक इन्स्टिट्यूट कोल्हापूर मधील सर्व विभागांना, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने “सर्वोत्तम” श्रेणीने मानांकित केल्याची माहिती इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सौ. अमृता माने यांनी दिली.
तंत्रशिक्षण मंडळाद्वारे राज्यातील इन्स्टिट्यूट च्या विविध निकषांच्या आधारे बाह्य परीक्षण केले जाते व त्याद्वारे त्या इन्स्टिट्यूटस श्रेणी दिली जाते असे त्यांनी यावेळी सांगितले. या वर्षी झालेल्या बाह्यपरीक्षणामध्ये सिबिक इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट निकाल, शैक्षणिक गुणवत्ता, अनुभवी प्राध्यापक, विध्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधी, इंनोव्हेशन कॉन्सिलच्या माध्यमातून विदयार्थ्यांना मिळणाऱ्या संशोधनाच्या आणि स्टार्टअपच्या सुविधा, ई सुत्रा क्रोनिकल्स, Shoponn सारख्या नामांकित कंपन्या, उद्योगांशी असणारा समन्वय तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा व मायक्रोपाथ, त्रिमुर्ती, अंबिका अशा नांमाकित लॅबोरेटरीज मध्ये विद्यार्थी इंटर्नशिप करत आहेत असे त्यावेळी त्यांनी सांगितले अशा निकषांवर सिबिक इन्स्टिट्यूटला “सर्वोत्तम ” मानांकन प्राप्त झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सिबिक इन्स्टिट्यूट ला सर्वोत्तम श्रेणी मिळाल्याबद्दल सिबिक संस्थेचे संस्थापक श्री. पारस ओसवाल, डायरेक्टर श्री. संजय दाभोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यकांत दोडमीसे, डायरेक्टर श्री. प्रतिक ओसवाल प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.