
no images were found
अभिनंदनीय निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी ): कोल्हापूर येथील कबड्डी अकडमीमध्ये प्रशिक्षण घेणारे तेजस मारुती पाटील,ओंकार नारायण पाटील,आदित्य शंकर पोवार व दादासो शिवाजी पूजारी या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंडळाच्या चार खेळांडूची प्रो-कबड्डीच्या येत्या दहाव्या सिझनसाठी विविध संघातून अभिनंदनीय अशी निवड झाली आहे .या कौतुकास्पद निवडीने कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्क्रुष्ट अशा कबड्डी परंपरेत-नावलौकिकात भरच पडली असल्याचे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रा. संभाजी पाटील यानी सांगितले.
परिश्रम,सरावातील सात्तत्य,प्रशिक्षकाकडून विविध कौशल्याचे मार्गदर्शन यातून कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूनी अनेक स्तरावर नेहमीच यश मिळविले आहे.राज्य व राष्ट्रीय अजिंक्यपद ,शालेय,आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे .जिल्ह्यात अनेक क्रीडामंडळे कार्यरत आहेत. यातच सर्व सुविधानीयुक्त अशा अकडमीची भर पडली आहे. गोकूळशिरगांव हद्दीत असलेल्या या राव’ज अकडमीमध्ये गेल्या तीन-चार वर्षापासून दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डा.रमेश भेंडिगिरी ,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू उमा भोसले-भेंडिगिरी यांच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाबरोबरीने प्रा.आण्णासाहेब गावडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिका-यांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम राबविले जातात.देशभरातून तसेच नेपाळ,थायलंड,बांगला देशासह अनेक देशाचेही खेळाडू येथे सरावास येतात.
अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्पर्धेसह वर्ल्डकपसाठी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेले रमेश भेंडिगिरी यानी प्रो कबड्डीमध्येही तेलगू टायटन संघाचे दोनवेळा,दभंग दिल्ली संघाचे एकदा व जयपूर संघाचे स्टटिजी कोच म्हणून जबाबदारी सांभाळली असून सद्या त्यांच्यावर हरियाणा स्ट्रेलर्स मार्फत नवोदित होतकरु खेळाडू शोधण्याची कामगिरी सोपविण्यात आली आहे.या अनुभवातूनही त्यांचे मार्गदर्शन खेळाडूना मिळत आहे.
जिल्हयातील अनेक खेळाडूनी मिळविलेल्या यशापाठोपाठ मानांकित आंतरराष्ट्रीय स्तर प्रो कबड्डी स्पर्धेसाठी यावर्षी कोल्हापूरच्या चार खेळांडूची झालेली निवड अभिमानास्पद अशीच असल्याचे प्रा.पाटील यानी सांगितले. यापूर्वीच्या प्रो कबड्डी सिझनमध्येही कोल्हापूरच्या खेळाडूनी नाव कमाविले असल्याचे त्यानी नमूद केले.
प्रो कबड्डीच्या येत्या दहाव्या सिझनसाठी येथील सह्याद्रि क्रीडा मंडळाचा गतवर्षापासून प्रो खेळणा-या तेजस मारुती पाटील (सडोली)या खेळाडूचा सप्टेंबरमधील ऑक्शननंतर संघ निश्चित होणार आहे. इचलकरंजीच्या जयहिंद मंडळाचा आदित्य शंकर पोवार याची बंगळूरु बुल्स संघात , शिंगणापूरच्या जिल्हा परिषद शाळेचा ओंकार नारायण पाटील याची तेलगू टायटन संघात तर शिरोलीच्या जय शिवराय मंडळाचा दादासो शिवाजी पूजारी याची पुणेरी फलटण संघात निवड झाली आहे. हे तीन खेळाडू पुढील सिझनसह प्रत्येकी वीस लाख रुपयातून करारबद्ध झाले आहेत.