no images were found
डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर डिझाईन स्पर्धेत यश
डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यानी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस, नवी मुंबई तर्फे आयोजित ‘मोटर स्पोर्ट रेसिंग ट्रॅक डिझाईन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले आहे.
साक्षी कोरे , यश अरोरा , शिवम कुंभार , वीणा प्रियोळकर आणि प्रणौती खतकर या विद्यार्थ्यांनी आर्किटेक्चरल स्पर्धेत प्रथमच मोटरस्पोर्ट ट्रॅक डिझाइन केले. नेरुळ, नवी मुंबई येथे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टसतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत हे डिझाईन्स राष्ट्रीय पातळीवरील देशभरातील २०० डिझाईनमधून टॉप १२ डिझाईनमध्ये निवडले गेले. त्यानंतर झालेल्या अंतिम फेरीत या डिझाइनला द्वितीय क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसचे अध्यक्ष आर्की. विलास अवचट यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी ट्रॅक डिझाइन करताना सुरक्षा, तांत्रिक आव्हान इत्यादी अनेक घटकांचा विचार करून सर्जनशीलता व डिझाइन कौशल्य या माध्यमातून त्यांनी हे डिझाइन तयर केले. प्रा. गौरी म्हेतर प्रा. पूजा जिरगे आणि प्रा. तिलोत्तमा पाडले व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे, वास्तुशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आय. एस. जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
नवी मुंबई: डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवताना आर्की. विलास अवचट.