Home शासकीय “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान यशस्वी करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन – जिल्हाध्यक्ष विजय जाधव

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान यशस्वी करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन – जिल्हाध्यक्ष विजय जाधव

1 second read
0
0
36

no images were found

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान यशस्वी करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन – जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांची विस्तृत माहिती देण्यासाठी भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहूल चिकोडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी हर घर तिरंगा, मेरी मिट्टी मेरा देश, विभाजन विभिषिका (फाळणी दिवस) अशा प्रदेश स्तरावरून आलेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थित सर्वांना दिली त्याचबरोबर मंडल स्तरावर याबाबत रचना करून हे कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थित त्यांना केले.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिनांक 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे तसेच स्वातंत्र्य दिना दिवशी सकाळी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पणत्या लावण्यासाठी
आवाहन करण्यात आले आहे.
मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत शहरातील हुतात्म्यांना स्मरून ऐतिहासिक ठिकाणांची माती एकत्रित करण्यात येणार आहे या एकत्रित केलेल्या मातीचा कलश आणि भारतीय वृक्ष
दिल्ली येथे होणाऱ्या मोदीजींच्या संकल्पनेला अमृत भारत उद्यान येथे रवाना करण्यात येणार आहे. विभाजन विभिषिका या दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या कार्यक्रमासाठी दिनांक 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत करवीर नगर वाचन मंदिर मध्ये चित्रफितीच्या माध्यमातून हा इतिहास लोकांच्या समोर मांडण्यात येणार आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरात मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हुतात्म्यांना स्मरणासाठी आयोजित केलेले हे सर्व कार्यक्रम पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रत्येक मंडळात बूथ स्तरावर यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात देश आंतरराष्ट्रीय प्रगती करत आहे. त्यामुळे मोदींजींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे. त्यासाठी, तालुका, जिल्हास्तरावर पक्ष बळकटी करण्यासाठी काम करायचं आहे. मोदी@9 अभियानांतर्गत आपण घरोघरी, गावोगावी पोहोचत आहोत. मोदींजींचे काम आपल्याला माता- भगिनींपर्यंत पोहोचवायचे आहे असे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सांगितले.
मोदींजींच्या अनेक कल्याणकारी योजनांचा दाखला देत आगामी काळात लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने काम करता येईल यावर माजी आमदार अमल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…