
no images were found
विभुतीला भूताने पछाडले!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’ विनोदी कथानकासह हसवून-हसवून लोटपोट करते. ही मालिका आता विनोदी व रोमांचक वळण घेणार आहे. रोमांचक मनोरंजनासाठी सज्ज राहा, जेथे विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख)विलक्षण स्थितीमध्ये सापडतो आणि त्याला निर्दयी भूत संतीराम पछाडतो. हा अनपेक्षित ट्विस्ट मॉडर्न कॉलनीमध्ये अनपेक्षित व विलक्षण घटना निर्माण करणार आहे. आगामी एपिसोडबाबत सांगताना विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख)म्हणाले, ”मास्टर भूप सिंगचा (विजय कुमार सिंग) संतीराम नावाचा निर्दयी गणिताचा शिक्षक होता, जो गणिताचे विलक्षण प्रश्न विचारायचा आणि चुकीच्या उत्तरांसाठी रूलरसह (संती) विद्यार्थ्यांना शिक्षा करायचा. संतीरामच्या पुण्यतिथीला भूप सिंग त्याच्या घरी जातो, त्याच्या फोटोसमोर त्याचे आवडतं खाणं व मद्य ठेवतो आणि त्याच्या परतण्याची विनंती करतो. दुसऱ्या दिवशी, लुटिया पेहलवान (अभिषेक अग्रवाल) आपल्या कर्जाची परतफेड घेण्यासाठी विभुतीचा (आसिफ शेख) पाठलाग करतो. विभुती स्वत:च्या घरामध्ये लपतो आणि दरवाजा लॉक करतो. तिवारी (रोहिताश्व गौड) पेहलवानला विभुतीच्या घरामध्ये जाण्यास मदत करतो. विभुती तेथून पळ काढतो आणि संतीरामच्या घरामध्ये लपतो, जेथे भूक लागल्याने तो मास्टरने संतीरामसाठी ठेवलेलं खाणं खातो. यामुळे संतीरामचा आत्मा विभुतीच्या शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे तो संतीरामसारखा दिसू व वागू लागतो. संतीरामच्या भूताने पछाडलेला विभुती गणिताशी संबंधित मजेशीर प्रश्न विचारण्यास सुरूवात करतो आणि सर्वांना चुकीच्या उत्तरांसाठी संतीसह शिक्षा देतो. दरम्यान, मास्टर भूप सिंग टिका (वैभव माथूर), टिलू (सलिम झैदी) आणि प्रेम (विश्वनाथ सोनी) यांना त्याच्या यूट्यूब चॅनेलबाबत सांगणार असताना संतीराम तेथे येतो. संतीरामला ओळखत भूप सिंग सर्वांना त्याची पार्श्वकथा सांगतो. संतीराम विलक्षण प्रश्न विचारतो आणि सर्वांना चुकीच्या उत्तरांसाठी संतीसह मारहाण करत राहतो, ज्यामुळे सर्वजण त्रस्त होतात.” अनिता भाबी (विदिशा श्रीवास्तव)म्हणाल्या, ”हा एपिसोड अत्यंत उत्साहवर्धक आहे, जेथे संतीराम अंगूरीकडे (शुभांगी अत्रे) त्याची माजी प्रेमिका मधुमती म्हणून पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. तो अनिताला (विदिशा श्रीवास्तव) त्याची मुलगी मानतो आणि विभुती सारख्या बेरोजगार माणसासोबत विवाह झाल्याचे समजल्यानंतर अस्वस्थ होतो. संतीराम अनिताचा विवाह तिवारीसोबत करण्याचे ठरवतो. तिवारी अंगूरीसमोर अनितासोबत विवाह न करण्याचे नाटक करतो, पण मनापासून खूप आनंदित असतो. अनिता हप्पू सिंगकडे (योगेश त्रिपाठी) तक्रार करते, जो संतीरामला अटक करतो. पोलिस स्टेशनमध्ये संतीराम हप्पूला संतीसह मारहाण करतो, त्याला प्रत्येक फटके मोजण्यास सांगतो आणि चुकीच्या उत्तरांसाठी अधिक शिक्षा देतो. चाचा (अनुप उपाध्याय) सर्वांना समजवतात की अनिताने सर्वांच्या ओळखीचा असलेल्या तिवारीसोबत विवाह करणे उत्तम ठरेल. प्रत्येकाची आशा सक्सेनावर (सानंद वर्मा) अवलंबून असते, ज्याने एका ऋषीकडून स्पर्शासह वेदनेपासून मुक्त करण्याची शक्ती मिळवलेली असते. विवाह होण्यापूर्वी विभुतीच्या शरीरामधून संतीरामचा आत्मा बाहेर काढण्यासाठी सक्सेना ऋषीची मदत घेतो. सक्सेना विभुतीला संतीरामच्या भूतापासून वाचवेल का आणि गोंधळाच्या स्थितीचे निराकरण करेल का?”