
no images were found
दररोज मी माझे 100 टक्के देते
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’ च्या सुरूवातीपासूनच ही मालिका आपली मनावर पकड घेणारी कथा आणि अमृता (सृती झा) आणि विराट (अर्जित तनेजा) यांच्यातील उत्तम ऑनस्क्रीन केमिस्ट्री यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. अमृता आणि विराट यांच्या ‘खोट्या’ लग्नाच्या सोहळ्यांचा आनंद प्रेक्षक सध्या घेत असताना आपला अनुचित फोटो कोणी लीक केला हे शोधून काढण्याचा प्रयत्न अमृता आणि विराट करत आहेत. त्याचवेळेस विराटची आई बबिता अहुजा (किशोरी शहाणे) विज ही स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.बबिता ही नेहमीच आपला मुलगा विराटबद्दल एक प्रोटेक्टिव्ह आई राहिलेली आहे पण अमृताबद्दलचा तिच्या मनातील द्वेष आता तिच्या आपल्या मुलावरील प्रेमापेक्षा अधिक झाला आहे आणि त्यामुळे ती विराटच्या विरोधात कठोर निर्णय घेत आहे. आपल्या व्यक्तिरेखेमध्ये अनेक बदल झाले असले तरी किशोरी मात्र बबिताच्या भूमिकेसाठी आपले सर्वोत्तम देत आहे. विराट अमृताच्या निकट होऊ नये म्हणून बबिता अवलंबत असलेले मार्ग अतिशय क्रूर असून किशोरी यांचे उत्तम अभिनय कौशल्य तिच्या व्यक्तिरेखेला संपूर्ण न्याय देते.
किशोरी शहाणे विज म्हणाल्या, “जेव्हा मला कळलं की बबिताची व्यक्तिरेखा अगदीच खलनायकी बनत आहे, तेव्हा खरंतर धक्काच बसला. सुरूवातीपासून मला असं सांगण्यात आलं होतं की बबिताची व्यक्तिरेखा मालिकेमध्ये बळकट असेल आणि ती कायमच विराटला वाचवेल. बबिता अहुजाच्या दृष्टीकोनातून ती आपल्या मुलाला वाचवत आहे आणि काहीही चुकीचं करत नाहीये. ही व्यक्तिरेखा साकारण्यामध्ये आव्हान म्हणजे ह्या व्यक्तिरेखेची जटिलता आहे. ती मुळात एक वाईट व्यक्ती नाहीये पण तिला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं आहे. असे काही क्षण असतात जेव्हा अमृताप्रति तिचे वागणे बदलते आणि मग मलाही ही व्यक्तिरेखा साकारताना अचानक वेगळे वळण घ्यावे लागते. मला वाटतं प्रेक्षकांनाही ते आवडतं. माझ्या व्यक्तिरेखेसाठी एक खोल कारण आहे आणि एक अभिनेत्री म्हणून अशा प्रकारच्या भूमिका साकारणे रोचक असते. दररोज मी माझे 100 टक्के देते म्हणजे बबिता अहुजा पुढील अनेक वर्षे लोकांच्या स्मरणात राहिल.”किशोरी ज्याप्रकारे बबिता अहुजाची भूमिका साकारत आहेत ते प्रेक्षकांसाठी अतिशय लक्षवेधी ठरत असून त्यातून त्यांची वैविध्यपूर्णता आणि एक अभिनेत्री म्हणून कौशल्य दिसून येते. जसजसे कथानक पुढे सरकत आहे, प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की काय विराट आणि अमृता यांचे खरोखरीच लग्न होईल आणि काय ते परिवारातील अपराधी कोण आहे हे शोधून काढू शकतील. काय त्यांना बबिताबद्दल कळेल?