no images were found
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम कौतुकास्पद: प्राचार्य डॉ. महादेव नरके
कोल्हापूर: गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. राजेंद्र नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेल्या वह्यांचे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांच्याकडून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप प्राचार्य नरके आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना डॉ. नरके यांनी
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २००७ पासून सुमारे ५४ लाख वह्यांचे बारा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना वाटप झाले असून या माध्यमातून या गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोठा हातभार लागल्याचे नमूद केले.
गरजू आणि गरीब मुलांना शिक्षण देणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साबळे, माजी नगरसेवक लाला भोसले, संदीप बिरांजे, विश्वविक्रम कांबळे, उदय कांबळे, बळी नामदास, दयानंद खवले, नागेश शिंदे,संगीता चकरे, मिना कांबळे ,मुख्याध्यापक उमेश गुरव,चारुशीला बिडवे,हनीफ नाकडे , नामदेव उंडे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते