
no images were found
भारतीय प्रजासत्ताकाला ‘भयभीत प्रजासत्ताक’…:- प्रकाश आंबेडकर
मुंबई :- संपूर्ण देशाची परिस्थिती आणि राज्यनिहाय निवडणूकपूर्व अंदाज वर्तवले जात आहेत. हे अंदाज आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच निवडणूकपूर्व अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात आकडेवारी नाही. कोणता पक्ष विजयी होणार? कुणाला किती जागा मिळणार? याचा हा अंदाज नाहीये. तर निवडणुकीपूर्व देशात काय होऊ शकतं? देशाची परिस्थिती काय असू शकते? याचा अंदाज आंबेडकर यांनी वर्तवला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून वर्ष बाकी आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जात आहे.
एक प्रकारे त्यांनी भविष्यातील संकटाची माहितीच आपल्या ट्विटमधून दिली आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत.