Home शासकीय फळे व भाजीपाला फिरत्या विक्री केंद्रासाठी प्रस्ताव सादर करा

फळे व भाजीपाला फिरत्या विक्री केंद्रासाठी प्रस्ताव सादर करा

15 second read
0
0
39

no images were found

फळे व भाजीपाला फिरत्या विक्री केंद्रासाठी प्रस्ताव सादर करा

 

कोल्हापूर : फळे व भाजीपाला फिरते विक्री केंद्राकरिता शीतचेंबरच्या सुविधेसह उत्पादकांकडून रेखांकन आराखडा व अंदाजपत्रक मागविण्यात येत आहे. इच्छुक उत्पादक व पुरवठादारांनी  info@mahantem.in या ईमेल पत्त्यावर प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येते. योजनेमध्ये पणन सुविधा अंतर्गत फळे व भाजीपाला विक्रीकरिता शीतचेंबरच्या सुविधेसह फिरते विक्री केंद्र या घटकास प्रोत्साहन दिले जाते. ग्राहकांच्या सुविधेसाठी लोकवस्तीमध्ये, लोकवस्तीजवळ कमी खर्चाचे फिरते फळे-भाजीपाला विक्री हातगाडी /केंद्र स्थापन करुन आवश्यक त्या वेळेस ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरविणे, हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे. या घटकामध्ये कुल चेंबरच्या सुविधेसह हातगाडी विक्री कट्टा, वजनकाटे इ. भांडवली खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जातो व प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १५ हजार रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या घटकाकरिता सुयोग्य असा रेखांकन आराखडा व अंदाजपत्रक निश्चित करावयाचे आहे. याकरिता इच्छुक उत्पादक व पुरवठादार कंपन्यांकडून फळे व भाजीपाला फिरते विक्री केंद्र शीतचेंबरच्या सुविधेसह (Mobile Vending Cart Platform with cool chamber) याकरीता रेखांकन आराखडा व प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव सादर करण्याकरिता अटी शर्ती कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…