no images were found
जलद “पायोनियर चषक” बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात
कोल्हापूर (प्रतिनिधी ) :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या सहकार्याने ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) ने पाच व सहा ऑगस्ट रोजी कै. मंगेशराव (गणेश) कुलकर्णी स्मृतिप्रित्यर्थ भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहे.पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ने या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत.
ब्राह्मण सभा करवीर(मंगलधाम) च्या सभागृहात या स्पर्धा शनिवार दि.5 ऑगस्ट व रविवार दि. 6 ऑगस्ट रोजी रंगणार आहेत. स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार या स्पर्धा एकूण 9 फेऱ्यात होणार आहेत. चाळीस हजार रुपयाची रोख बक्षीसे शिवाय चषक व मेडल स्वरूपात मुख्य व उत्तेजनार्थ मिळून एकूण 121 बक्षिसे ठेवली आहेत.स्पर्धा विजेत्यास रोख आठ हजार रुपये व आकर्षक पायोनियर चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्यास रोख सहा हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख चार हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.याशिवाय 4 ते 21 क्रमांकापर्यंत रोख रुपये व मेडल बक्षीस रुपात ठेवण्यात आली आहेत.याशिवाय 7,9,11,13 व 15 वर्षाखालील मुले,उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू,उत्कृष्ट जेष्ठ बुद्धिबळपटू,उत्कृष्ट बिगर गुणांकित बुद्धिबळपटू,उत्कृष्ट सोळाशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू व उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू या प्रत्येक गटात दहा बक्षीसे अशी एकूण 100 उत्तेजनार्थ बक्षीस रोख वा मेडल स्वरूपात ठेवली आहेत.याशिवाय सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले हे मुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.त्यांना करण परीट व आरती मोदी प्रामुख्याने सहकार्य करणार आहेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये स्पर्धा शुल्क ठेवले आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी मनीष मारुलकर – 9922965173 , धीरज वैद्य – 9823127323,आरती मोदी – 8149740405 व रोहित पोळ – 9096221178 यांच्याशी संपर्क साधावा व आपली नावे प्रवेश शुल्कसह गुगल फॉर्म भरुन नोंदवावीत. ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष अँड.विवेक शुक्ल, पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटणकर व ब्राह्मण सभा करवीर चे कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी जास्तीत जास्त बुद्धिबळपटू नी स्पर्धेत सहभागी व्हावे व स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन या पत्रकाद्वारे केले आहे.