no images were found
1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन – उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल विभागाकडून 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहात आयोजित युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद आदी उपक्रमांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात महसूल वन विभागाच्या शासन नियमानूसार सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आपल्या क्षेत्रामध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
महसूल विभागाने जिल्हा स्तरीय महसूली कामे वेळच्यावेळी पुर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे आदी कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार, महसूली वसुलीचे उदिष्ट पार करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षी दिनांक 01 ऑगस्ट, 2023 हा ‘महसूल दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.