no images were found
भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाचे आंदोलन
कोल्हापूर – काँग्रेस पक्ष, डावे, तसेच अन्यांकडून ऋषीतुल्य असलेल्या पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर अकारण आरोप केले जात आहेत. तरी मूठभर लोकच गुरुजींच्या विरोधात असून सकल हिंदू समाज पू. भिडेगुरुजी यांच्या पाठीशी आहे, हे सांगण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवतीर्थ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे जाहीर समर्थन करनारे आंदोलन करण्यात आले. ‘काँग्रेसला यापुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी देण्यात आली. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजी यांच्या पाठीशी सकल हिंदू समाज आहे. काँग्रेसने पू. भिडेगुरुजी यांच्या संदर्भात जर अयोग्य शब्दांचा वापर केला, तर जशास तसे प्रत्त्युत्तर देण्यात येईल.’’
या प्रसंगी धारकरी अभिनंदन सोळांकुरे म्हणाले, ‘‘पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी जी माहिती सांगितली असे सांगितले जाते ती माहिती अमिताव घोष यांनी लिहिलेल्या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकाच्या आधारे दिली आहे. हे पुस्तक वर्ष १९८३ मध्ये प्रकाशित झाले आहे. अमिताव घोष यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे १६ वे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. १९२ पानांच्या या पुस्तकात १०६ क्रमांकाच्या पानावर गांधींच्या जन्माच्या संदर्भातील उल्लेख आहे.’’
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे त्या पुस्तकावर आजपर्यंत बंदी आलेली नाही, त्यामुळे आपण हाही प्रश्न विचारला पाहिजे की, ही माहिती जर खोटी असेल, तर आजपर्यंत या पुस्तकावर का कारवाई झाली नाही ?’’
यावेळी शहर कार्यवाहक श्रीआशिष लोखंडे यांनी राष्ट्र कार्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन आंदोलन करणे हे सकल हिंदू समाजाला पटण्यासारखं नाही त्यामुळे यंदा येणाऱ्या आगामी निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून समाज यांना ज्यांनी पातळी सोडून आदरणीय गुरुजींच्या वरती शिंतोडे उडवले त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आमचं ठरलंय यंदा इस्कुट करायचा अशा पद्धतीचे मत व्यक्त केलं
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सेवाव्रत प्रतिष्ठानचे श्री. संभाजी साळुंखे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे श्री. उदय भोसले, प्रांत उपाध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, श्री गणेश जाधव, श्री रोहित अतिग्रे,श्री अर्जुन चौगुले, श्री नितीन चव्हाण, श्री विजय गुळवे, श्री प्रकाश संकपाळ, श्री अनिकेत पाटील, श्री अभिषेक खडके, श्री आशिष पाटील, श्री निलेश पाटील, श्री शिवाजीराव मोटे, श्री प्रथमेश मोरे, श्री आदित्य जासूद, संजय जासूद, राजू गडकरी यासंह अन्य उपस्थित होते.