Home क्राईम अकरा वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

अकरा वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

3 second read
0
0
42

no images were found

अकरा वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर  :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे संपन्न झाल्या..
मुलांच्या गटात स्विस् लीग पद्धतीने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सहाव्या फेरी मध्ये पहिल्या पटावर पाच गुणासह आघाडीवर असलेल्या द्वितीय मानांकित इचलकरंजीचा रियार्थ पोद्दार व सहावा मानांकित जयसिंगपूरचा हित बलदवा यांच्यातील डाव बरोबरीत सुटल्यामुळे रियार्थ पोद्दारने साडेपाच गुणासह अजिंक्यपद पटकावले.दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित जांभळीच्या अभय भोसले ने कोल्हापूरच्या सिद्धार्थ चौगुलेचा पराभव केला तर तिसऱ्या पटावर चौथा मानांकित इचलकरंजीच्या शौर्य बगडियाने कोल्हापूरच्या अर्णव पाटील वर विजय मिळविला.हित,शौर्य व अभय या तिघांचे समान पाच गुण झाल्यामुळे बकोल्झ् टायब्रेक गुणांनुसार शौर्य बगडीया ला उपवितेपद मिळाले तर अभय भोसले ला तिसऱ्या स्थानी व हित बलदवा ला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.मुलींच्या गटात राउंड रॉबिन पद्धतीने झालेल्या स्पर्धेत अग्रमानांकित नांदणीच्या सिद्धी बुबने ने अपेक्षेप्रमाणे सातपैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले.द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ने सहा गुणांसह उपविजेतेपद मिळविले.कोल्हापूरची राजेश्वरी मुळे व इचलकरंजीचे सांची चौधरी या दोघींचे समान चार गुण झाल्यामुळे टायब्रेक गुनानुसार राजेश्वरीनेे तृतीय स्थान तर सांचीला चौथे स्थान मिळाले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री सागर मुळे सौ.पुनम सोनी,सौ.खुशबु पोद्दार व सौ.सुगंधा बुबने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, धीरज वैद्य व आरती मोदी उपस्थित होते.28 जुलै ते 30 जुलै दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटू
मुले :- 1) रियार्थ पोद्दार इचलकरंजी 2) शौर्य बगडीया इचलकरंजी
मुली :- 1) सिद्धी बुबने नांदणी 2) सिद्धी कर्वे जयसिंगपूर

Load More Related Articles

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…