no images were found
कोल्हापुरात मुसळधार पाऊस पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. लहान लहान ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत.
25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुपारपासून गेळवडे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कासारी नदी पात्रा बाहेर पडली असून कासारी नदीवर असणारा बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे ,त्यामुळे बर्की, बुरानवाडी, बरकी धनगरवाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. बर्की पुलावरून धोकादायकपणे पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत म्हणून शाहूवाडी पोलिस स्टेशनकडून सकाळपासूनच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या २३ फुटावर आली आहेत.
राधानगरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरु असून धबधबे ओसंडून वाहत आहेत.. वाऱ्याला प्रचंड वेग आहे. अनेक झाडे उन्मळून पडत आहेत तरी वर्षा पर्यटनाचा मोह टाळावा अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
शाहूवाडी: मलकापूर अनुस्कुरा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक अंशतः बंद, आजरा : किटवडे धरण वाहतूक मार्गांवर पाणी आल्याने अंशतः वाहतूक बंद, सालगाव पुलावर पाणी आल्याने पर्यायी सोहाळे मार्गाने वाहतूक सुरू, भुदरगडः रांगणा किल्ल्यावर अडकलेल्या 17 पर्यटकांची सुखरूप सुटका, पन्हाळा: पिसात्री येथील जांभळी नदीच्या पुलावर चार फूट पाणी, पडसाळी मार्गे वाहतूक बंद, गगनबावडा : टेकवाडी येथील मोहरीवर पाणी आल्याने वेतवडे, बालेवाडी मार्ग बंद