no images were found
३०० पेक्षा अधिक लहान मुले वर्ल्ड रेकॉर्डसाठी उतरणार
कोल्हापूर : बाल कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा उद्देश समोर ठेवून येत्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कोल्हापूरात ‘लोक संस्कृतीच्या रंगछटा’ अशा भव्यदिव्य वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेचे थिंकर फौंडेशन ऑफ इंडिया आणि नटराज डान्स स्टुडिओ कोल्हापूर यांच्या संयुक्तविद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेमध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक लहान मुले वर्ल्ड रेकॉर्डसाठी उतरणार आहेत. साधारणपणे ५ ते १३ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश असेल. या स्पर्धेच्या परिक्षणासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुककडून तज्ज्ञ परिक्षकांची टिम येणार आहे.
कोल्हापूरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बाल कलाकारांनी सहभागी व्हावे. स्पर्धेतील सहभागी कलाकारांना वर्ल्ड रेकॉर्ड बुक कडून प्रमाणपत्र, मेडल दिले जाणार आहे, अशी माहिती नटराज डान्स स्टुडिओ चे संस्थापक नृत्यदिग्दर्शक अक्षय कदम यांनी दिली.
यावेळी मिसेस इंडिया राजेश्वरी मोटे, थिंकर फौंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे प्रेसिडेंट उत्तम मांढरे, महाराष्ट्र स्टाईल आयकॉन रेणुका केकतपुरे, समुपदेशक अभिषेक यादव, महाराष्ट्र पोलीस मित्र समिती शहर सचिव कल्याणी निरुके आदी उपस्थित होते.