no images were found
नेहरू युवा केंद्र मार्फत युवा महोत्सव उत्साहात साजरा
कोल्हापूर : नेहरू युवा केंद्र मार्फत विवेकानंद महाविद्यालयात आयोजित केलेल्या युवा उत्सवाची आज यशस्वी सांगता झाली. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या उत्सवात, युवक युवती,विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेत, विविध स्पर्धा आणि कार्यक्रमातून आपल्या कलाकौशल्याची चुणूक दाखवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ अभयकुमार साळुंखे होते. प्रमुख अतिथी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दीपक पाटील, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी दिपा शीपुरकर, केंद्रीय संचार ब्युरोचे महेश चोपडे, शिवाजी विद्यापीठाच्या NSS संचालक प्रा. टी. एम. चौगुले, विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ.पी.टी.गायकवाड, जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या श्रीमती जमादार, श्री. देशपांडे, NSS विभागाचे प्रा. संदीप पाटील, NCC विभागाच्या सुनीता भोसले, जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, लेखाधिकारी भानुदास यादव, कार्यक्रम सहायक गणेश भोसले इ. मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मुदगल नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. आपण योग्य दिशेने वाटचाल केली तर समाज आणि पर्यावरणासाठी त्याचे सकारात्मक परिणाम निश्चित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवा उत्सवाचे परीक्षण सकाळचे अवधूत गायकवाड, रोहित शिंगे, गारगीदेवी निंबाळकर, तेजस्विनी चिले, प्रमोद कसबे, गणेश लोळगे, किशोर कांबळे, बबन माने, मनीषा कुलकर्णी, मोबीन नदाफ, किरण मोरे निलेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन, विवेकानंद महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले.
विवेकानंद महाविद्यालयात आयोजित ह्या युवा उत्सवाने यशस्वीपणे तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. हा कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्यासोबतच, प्रकाशनांमधून शिकण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून अत्यंत उपयुक्त ठरला. नेहरु युवा केंद्र कोल्हापूरचे गणेश भोसले यांनी आभार मानले.