
no images were found
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने आंध्र, बिहार मध्ये खळबळ
नवी दिल्ली :- वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. ते एनडीएमध्ये सामील होऊ शकतात; परंतु विधानसभा निवडणुकीनंतरच. इतर पाच राज्यांसह नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लवकर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी ते इच्छुक आहेत.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. याचमुळे दुरावलेला भागीदार अकाली दलाला एनडीए आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यावर फेरविचार झाला असल्याचे सूत्राने सांगितले आहे. भाजपने अकाली दलाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार सुखबीर सिंह बादल यांनाच त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्याऐवजी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने कर्नाटकात जनता दल (एस)बरोबर युती करण्याचे ठरवले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आता राज्यपाल म्हणून पाठवले जाऊ शकते, असे संकेत आहेत. कारण त्यांच्या पत्नी ज्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत त्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याची राजकीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खळबळजनक घडामोडीनंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या विचारात असल्याचे वृत्त पाटण्यातून येत आहे.
विधानसभा जिंकल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना आंध्र प्रदेशात भाजप- टीडीपी युती रोखायची आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे १७ खटले आहेत.